कोरोना चाचणी दरम्यानचा निष्काळजीपणा बेतला महिलेच्या जीवावर; नाकातून स्वॅब घेताना मेंदूजवळील भागाला धक्का

वॉशिंग्टन । अनेक देशांमध्ये करोनाची चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. करोना चाचणीसाठी नाकातून नमुने घेतले जातात. मात्र, या चाचणी दरम्यान केलेला निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. करोना संसर्गासाठी करण्यात येणाऱ्या स्वॅब चाचणीमुळे एका महिलेचे प्राण धोक्यात आले आहे. नाकातून स्वॅब जमा करताना ब्रेन लायनिंगला धक्का लागला आणि तिच्या नाकातून मेंदूचा फ्लूड बाहेर पडू लागला. ही धक्कादायक … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार

मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. येत्या गुरुवारपर्यंत एक महिन्याचा पगार होणार आहे. या पगाराबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. दरम्यान, उर्वरित पगाराबाबत लवकरच निर्णय होईल, असे ट्विट अनिल परब यांनी केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या पगाराबाबत अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत … Read more

‘त्यांना अशी शिक्षा करू कि…’ हाथरस प्रकरणावर योगी आदित्यनाथ यांनी अखेर सोडलं मौन

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यातील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. हाथरास प्रकरणात पीडितेच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा आणि कारवाईत केलेली दिरंगाई यामुळं योगी सरकार टीकेचे धनी बनले आहे. इतकेच नव्हे तर या प्रकरणामधील पीडित तरुणीच्या नातेवाईकांना तिच्यावर अंत्यसंस्कारही करुन … Read more

राहुल गांधी पंजाब व हरयाणामध्ये काढणार ट्रॅक्टर रॅली; कृषी कायद्यांवरून आक्रमक

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधातला शेतकऱ्यांचा विरोध अजूनही मावळलेला नाही. पंजाब, हरयाणासह देशातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरू आहेत. रस्त्यावर उतरून शेतकरी आपला रोष आणि विरोध व्यक्त करत आहेत. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी घेतला असून, ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान पंजाब व हरयाणामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली … Read more

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 … Read more

एमआयएम पाठोपाठ वंचित बहुजन आघाडी उतरली बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंत राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची २५ सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली. त्यामुळे बिहारमध्ये काय निकाल येतात याकडे सगळ्याचंच लक्ष लागलं आहे. अशा वेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवणारे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं बिहार निवडणुकीत उडी घेतली आहे. बिहार विधानसभा लढवत असल्याची घोषणा काही … Read more

आजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश

हॅलो महाराष्ट्रात । वर्तमानात देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होऊन हा समाजच स्त्रियांचा भक्षक बनला आहे असं चित्र आहे. उत्तर प्रदेशमध्ये मागील दोन दिवसांत तीन मुलींवर बलात्कार झाले आहेत. राजस्थानमध्येही अशीच घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस पीडितेला मरणानंतरही सन्मानपूर्वक वागणूक मिळाली नाही. दर दिवशी बलात्कारानंतर हत्येच्या अंगावर काटा आणणाऱ्या घटना देशाच्या कुठल्यानं कुठल्या कोपऱ्यातून कानी … Read more

‘मी अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’; गांधी जयंतीला राहुल गांधींचा निर्धार

नवी दिल्ली । हाथरस पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुरुवारी अटक करण्यात आल्यानंतर आज त्यांनी ‘अन्यायासमोर झुकणार नाही, असत्यावर सत्यानं विजय मिळवेन’ या शब्दांत गांधी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही … Read more

महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन

मुंबई । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी … Read more

मराठा आरक्षणावर पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे पुत्र पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत एक ट्विट केलं होतं. बीडमधील विवेक रहाडे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर, मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचं पार्थ पवार यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पवार कुटुंबात दुमत असल्याचे चित्र माध्यमांमध्ये रंगू लागले होते. दरम्यान, पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची … Read more