आठवलेंचा एक आमदार, एक खासदार तरी आहे का? NDAमध्ये सामील होणाच्या ऑफरवर शरद पवारांचा टोला

पंढरपूर । केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी  होण्याची ऑफर दिली होती. जर शिवसेना भाजपासोबत येणार नसेल तर शरद पवार यांनी राज्याच्या भल्यासाठी NDA मध्ये सहभागी व्हावं. भविष्यात त्यांना मोठं पद मिळू शकतं असा सल्ला आठवले यांनी पवारांना दिला होता. त्यावर ”रामदास आठवले यांच्या पक्षाचा एक आमदार किंवा … Read more

मराठा आरक्षणाचा प्रश्न दोन छत्रपतींनी भाजपाकडूनचं सोडवून घ्यावा – शरद पवार (Video)

पंढरपूर । छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे ते भाजपचीच भाषा बोलणारच. दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून घ्यावा असे कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. … Read more

जगविख्यात ‘अ‍ॅमनेस्टी’स्वयंसेवी संस्थेनं भारतातील काम केलं बंद; मोदी सरकार सूडबुद्धीने मागे लागल्याचा केला आरोप

नवी दिल्ली । ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या जगविख्यात स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी भारतामधील आपले कामकाज थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. एका करावाईच्या नावाखाली केंद्रातील मोदी सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला संस्थेची काही बँक अकाऊंट फ्रीज केली. त्यानंतर संस्थेना नाईलाजाने अनेक कर्मचाऱ्यांना कमावरुन काढावं लागलं होतं. भारत सरकारकडून मानवाधिकारासंदर्भात काम करणाऱ्या संस्थांच्या विरोधात चालवण्यात येणाऱ्या विच हंट (हात धुवून मागे … Read more

व्यक्तिगत स्वार्थासाठी महाराष्ट्राची बदनामी करत असेल तर आम्ही.. ; राऊतांचा कंगनाला सूचक इशारा

मुंबई । मुंबईतील जुहू येथील कंगनाच्या कार्यालयावर अनधिकृत बांधकामप्रकरणी करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आलं असून बाजू मांडण्यास सांगण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी आपण बाजू मांडणार असून कोणी महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही असा इशाराही दिला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. … Read more

कोरोनानंतर आणखी एका विषाणूचा धोका; ICMRकडून सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली । कोरोना नावाच्या विषाणूने घातलेला धुडगूस आजही कायम आहे. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोनाने साऱ्या जगाच्याच नाकीनऊ आणले आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक लागतो. आजही दिवसाला एक लाखाच्या आसपास रुग्ण देशात सापडत आहेत. या महामारीने झालेले आर्थिक नुकसान दुरगामी आहे. मात्र अशातच आता नव्या व्हायरसचा शोध लागला आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडीकल … Read more

कृषी कायद्यांना राज्य सरकारचा विरोध; अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरु

मुंबई । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांना महाराष्ट्रात विरोध दर्शवला आहे. केंद्राच्या कायद्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी होणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यानुसार कृषी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात आलेली अधिसूचना रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या एक-दोन दिवसात ही अधिसूचना रद्द केली जाण्याची शक्यता आहे. शेतकरी विषयक कायदे … Read more

सुब्रमण्यम स्वामींनी राजीव गांधींना दिलं राम मंदिराचं श्रेय, मोदींबाबत केलं ‘हे’ धक्कादायक विधान

नवी दिल्ली ।  अयोध्येतील वादग्रस्त जागेसंदर्भात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला होता. या निकालानंतर अयोध्येत राम मंदिराच्या कामाला सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या कामाची पायाभरणी करण्यात आली. दरम्यान, भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी राम मंदिराच्या योगदानावरून मोदींवर निशाणा साधला आहे. अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराच्या निर्णयात … Read more

सहकारी बॅंक घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील आमदाराच्या घरावर पोलिसांची धाड; अलिशान मोटारी, किमती वस्तू जप्त

पुणे । पुण्यातील एका आमदाराच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. एका सहकारी बॅंकेसंदर्भातील घोटाळ्याबाबत हे छापे असल्याचे सांगण्यात आले. यावर पोलिस लवकरच अधिकृत माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले. याआधी एका सहकारी बॅंकेतील तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी सदर आमदारावर आमदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त … Read more

‘राजकीय चर्चा करणं हा काय गुन्हा आहे का?’ फडणवीसांसोबतच्या भेटीवर राऊतांचा प्रतिप्रश्न

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांना आणखी हवा देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत राजकीय चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. “जर दोन वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते भेटत असतील तर नक्कीच राजकीय चर्चा होणार,” असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, संजय राऊत … Read more

महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती- चंद्रकांत पाटील

मुंबई । महाराष्ट्रात सध्या मध्यावधी निवडणुकांसारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पाटील मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांचं जे सरकार आहे त्या सरकारमध्ये समन्वय नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं पाटील यांनी म्हटलं आहे. मध्यावधी निवडणूक ही खरंतर कुणालाच नको … Read more