सिल्लोडमधील ‘त्या’ खुनाचा ७ महिन्यानंतर लागला तपास; १ लाखाच्या मुद्देमालासह तिघांना अटक

सिल्लोड शहरातील प्रियदर्शनी चौकात वाईन शॉपवर हल्ला करण्यात आला होता. यात मॅनेजर भिकन निळूबा जाधव व त्याचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे या दोघांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आला होता. तसेच त्यांच्याकडील 4 लाखांची रोख रक्कम घेऊन अज्ञात आरोपींनी पळ काढला होता. यातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

उद्योजक ‘डीएसके’ यांच्यासह पत्नी, मुलाला सांगली पोलिसांकडून अटक

गुंतवणूक रकमेला व्याज तसेच वस्तू खरेदीवर सवलतींचा वर्षाव करून सांगलीकरांना पावणेपाच कोटीचा गंडा घालणार्‍या उद्योजक दीपक कुलकर्णी उर्फ डीएसके यांच्यासह पत्नी व मुलाला सांगलीच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज अटक केली. सांगली शहर पोलिस ठाण्यात या तिघांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा आहे. अटक केलेल्यांमध्ये डिएसके, त्यांची पत्नी हेमंती व मुलगा शिरीष यांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये ५ लाखांची खंडणी स्वीकारतांना राजकीय पुढाऱ्याला अटक

शिक्षण संस्था चालकाला ब्लॅकमेल करून खंडणी मागून ५ लाख रूपये स्वीकारताना राजकीय पुढाऱ्याला शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. हा पुढारी समाजवादी पक्षाचा औरंगाबादचा प्रमुख महासचिव असल्याचं समजत आहे. अमितकुमार सिंग असं पुढाऱ्याच नाव असून या प्रकरणात सहभागी त्याच्या साथीदारांदेखील पोलिसांनी अटक केली गेली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. सिंग याच्यावर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सुद्धा समोर अली आहे.

पिंपरी : आलिशान कार चोरणारा आरोपी गजाआड

सर्व्हिसिंगसाठी आलेली आलिशान कार बावधन येथून चोरण्यात आली होती . या गुन्ह्यातील आरोपीस नुकतीच गोव्यातून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांनी ही कामगिरी केली. वसिम कासिम सय्यद (वय ३२, रा. गुगल हौसिंग सोसायटी, मडगाव, गोवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विकास परदेशी यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठाण्यात ज्वलनशील केमिकल साठ्यावर छापा, २ केमिकल माफियांना अटक  

भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तिर्थराज पाल आणि विरल गंबीया असे अटक केलेल्या केमिकल माफियांची नाव आहेत.

हॉटेल व्यवसायिकाची अश्लील चित्रफीत काढून खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक

सांगली प्रतिनिधी। मिरज शहरातील प्रसिद्ध रहमतुल्ला हॉटेलचे मालक मेहबुब तहसिलदार यांची अश्लिल चित्रफीत काढून त्यांना बदनामी करण्याची धमकी देत खंडणी मागितल्या प्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांच्यासह मक्सूद भोकरे, मक्सूद जमादार, कामील बागवान, अक्रम काझी यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर मिरज शहर पोलिसात धमकी आणि खंडणीचा … Read more

बंगल्यामध्ये सुरु असणाऱ्या कुंटन खान्यावर छापा

सांगली प्रतिनिधी| स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबिंध कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यावर छापा टाकून त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु असलेला वेश्या अड्डा उध्वस्त केला. या ठिकाणाहून २ महिलांना अटक केली आहे, तर एका पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. सुभाषनगर येथील … Read more

चलनातून बाद झालेल्या एक कोटी च्या नोटांसह तिघे अटकेत

औरंगाबाद प्रतिनिधी। चलनातून बाद झालेल्या हजार-पाचशेच्या नोटा कमी किमतीत विकण्यासाठी आलेल्या व विकत घेणाऱ्या तिघांना उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून एक कोटी रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या हजार पाचशेच्या नोटा पोलिसांनी आज जप्त केल्या. इसाक शब्बीर शाह वय-40 (रा.गंगापूर) असे नोटा बदलण्यासाठी आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर मोहम्मद नईम मोहम्मद इब्राहिम व मोहम्मद इलियास … Read more