पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; कृषी कायद्याच्या विरोधात उतरल्या होत्या रस्त्यावर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चव्हाण या कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरल्या आहेत. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर आज कृषी कायद्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोको करुन आंदोलकांनी आपला निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी चक्काजाम आंदोलन करणार्‍यांना ताब्यात घेतले. यामध्ये चव्हाण यांच्या … Read more

रयतचे माजी अध्यक्ष दानशुर बंडो गोपाळा कदम यांची 140 वी जयंती उत्साहात; कराडच्या SGM काॅलेजची केली स्थापना

Danshur Bando Gopala kadam

कराड प्रतिनिधी | रतय शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, विश्वस्त व चेअरमन दानशूर बंडो गोपाळा कदम उर्फ मुकादम तात्या यांची आज 120 वी जयंती आहे. यानिमित्ताने मुकादम तात्या यांच्या जयंतिनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या जन्मगावी कुसुर येथे जंयती सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामिण भागात शिक्षण पोहोचवण्यात तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडनेत तात्यांचा मोठा वाटा … Read more

लॉटरी लागल्याच्या बहाण्याने युवतीकडून उकळले लाखो रुपये ; अज्ञातांविरोधात पोलीस तक्रार दाखल

कराड : लॉटरी लागल्याची बतावणी करून बँक खात्यात वेळोवेळी सुमारे दीड लाख रुपये भरायला लाऊन युवतीची फसवणूक करण्यात आली. याबाबत फसवणूक झालेल्या युवतीने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा शिवाजी भोसले (रा. ओंड, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड ग्रामीण पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

वीस लाखाचा गंडा घालणार्‍यास अटक; कराड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड :-शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून कराड शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास कराड शहर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथून अटक केली. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. गुरूवारी त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची … Read more

कराडच्या जुन्या पुलावरून सुरू होणार चार चाकी वाहतूक – पृथ्वीराज चव्हाण

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड | कराड शहराला जोडणाऱ्या दीडशे वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन कोयना पुलाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाहणी केली. पूलाचे मजबुतीकरण करण्यात आले असून काही दिवसात हलक्या चार चाकी वाहनांसाठी हा पूल सुरु करण्याच्या सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, आत्ता पुलावरून दुचाकी वाहने … Read more

खाजगी शाळांची मुजोरी; पोद्दार इंटरनॅशनल कडून लाॅकडाऊनमध्ये शांळा बंद असूनही 100% फी वसूली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सक्तीच्या फी वसुलीच्या विरोधात कराडच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर पालकांचे निषेध आंदोलन चालू आहे. खरं तर लॉकडाउन मध्ये स्कूल बंद असूनही या पोद्दार इंटरनॅशनल स्कुल कडून सक्तीची 100 % फी ची मागणी करण्यात आली आहे. त्याविरोधात पालकांनी हे आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात दीडशे ते दोनशे पालक उपस्थित आहेत. 50% … Read more

हे तर चव्हाण- उंडाळकर मनोमिलनाला जनतेने दिलेलं प्रत्युत्तर – अतुल भोसले

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण मतदार संघातील 52 पैकी निम्म्या आणि बलाढय ग्रामपंचायतीमध्ये भाजपाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत निर्विवाद वर्चस्व मिळवले असून असून कराड दक्षिण मतदार संघातील ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल म्हणजे विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांनी निवडुन येण्यासाठी केलेली अनैतिक युती व चव्हाण उंडाळकर मनोमिलनाला मतदारांनी दिलेले उत्तर आहे … Read more

कराड : नांदगाव ग्रामपंचायतीत काका बाबा गटाला धक्का; 10 वर्षांनंतर संत्तांतर, अतुल भोसले गट विजयी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे. नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील … Read more

ग्रामपंचायत निवडणूक | काले गावात पुन्हा एकदा भीमराव दादांचा करिष्मा ; तब्बल 14-3 ने ग्रामपंचायत ताब्यात

कराड | कराड तालुक्यातील सर्वात महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या काले या गावात पुन्हा एकदा जेष्ठ नेते भीमराव दादा पाटील यांचे वर्चस्व दिसून आले. भीमराव दादा पाटील गटाच्या व्यंकनाथ ग्रामविकास पॅनल ने तब्बल 14 – 3 असा दणदणीत विजय मिळवून काल्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन केली आहे. काले गावात विरोधकांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. … Read more

कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कार्वे मध्ये अतुल भोसले पॅनेलचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यात सगळीकडे ग्रामपंचायत निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या कार्वे गावात अतुल भोसले यांचे पॅनल विजयी झाले आहे. अतुल भोसले यांच्या पॅनेलने 10/7 असा दमदार विजय मिळवला आहे. एकूण 17 वॉर्ड असलेल्या गावात अतुल भोसलेंच्या भाजपने 10 जागांवर विजय मिळवला तर कॉंग्रेसला 7 … Read more