धक्कादायक ! त्रास देते म्हणून अल्पवयीन मुलाने केली जन्मदात्या आईची हत्या

murder

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील तळेगाव दाभाडे या ठिकाणी आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्याला सावत्र आई त्रास देते म्हणून एका अल्पवयीन मुलाने कोयत्याने वार करून आईची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे तळेगाव दाभाडेमध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील श्रीहरी कॉलनीत राहणाऱ्या रेखा जाधव … Read more

लव्ह, सेक्स आणि धोका! विवाहित प्रियकराने एक्स गर्लफ्रेंडचा ‘या’ प्रकारे घेतला सूड

भोपाळ : वृत्तसंस्था – भोपाळमधील एका युवकाने तरुणीसोबत आधी मैत्री केली आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, तरुणीचे लग्न दुसरीकडे ठरल्याचे समजताच त्या तरुणाने तिच्या सासरी फोन केला. त्याने फोन करून सांगितले कि, तुमची होणारी सून आधीच दुसऱ्या कोणाची झाली आहे. यानंतर सासरकडच्या लोकांनी हे लग्न मोडले. हा युवक स्वतःही आधीपासूनच … Read more

जोडप्याने केला वृद्ध महिलेचा खून, ‘या’ प्रकारे झाला खुनाचा उलगडा

murder

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिलेचा खून करून फरार झालेल्या पती-पत्नीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. एकाच सोसायटीत शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या या वृद्धेची या दोघां पती पत्नीने दोरीने गळा आवळून हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे तीन मोठ्या बॅगांमध्ये भरून नाल्यात फेकून दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा अखेर छडा लावला … Read more

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने विवाहित महिलेसोबत केले ‘हे’ विकृत कृत्य

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून आपल्याच नात्यातील एका विवाहित महिलेचा छळ केला आहे. या आरोपी तरुणाने नातेवाईक असणाऱ्या विवाहित महिलेला जबरदस्तीने मिठी मारून तिचे फोटो काढले. एवढेच नाहीतर त्याने हे फोटो पीडितेच्या नवऱ्याला आणि अन्य नातेवाईकांना पाठवले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा … Read more

धक्कादायक ! विवाहित महिलेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न

Poision

धाड : हॅलो महाराष्ट्र – धाड या ठिकाणी एका विवाहितेस विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी धाड पाेलिसांनी सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. ही घटना १० जुलै राेजी घडली हाेती़. या विवाहित महिलेवर बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत़. धाड येथील फौजीया आफरीन म. नसीम या विवाहित महीलेस … Read more

मूकबधिर तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर अटक

Girl arrested

कल्याण : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वी कल्याण पश्चिमेकडील निर्मनुष्य असलेल्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये एका मूकबधिर तरुणीवर एका नराधमाने बलात्कार करून तिच्याजवळील मोबाईल हिसकावून तेथून पळ काढला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या शोधासाठी 5 तपास पथके तैनात केली होती. अखेर त्या नराधमाला पकडण्यात पोलिसांना यश … Read more

एकटी मुलगी पाहून घरात शिरला अन्…; 3 तासांनी आरोपीनं गळफास घेत संपवलं जीवन

Rape

जालना : हॅलो महाराष्ट्र – जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील एका तरुणाने मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कदायक प्रकार घडला आहे. यावेळी मुलीने आरोपीला विरोध करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केल्याने आरोपीने पीडित मुलीला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली आहे. मुलीला मारहाण केल्यानंतर घाबरलेल्या तरुणानं घटनेच्या तीन तासानंतर गळफास घेऊन स्वतः आत्महत्या … Read more

निवडणुकीत फ्रॉड करणे भोवले, ‘या’ भाजप आमदाराची तुरुंगात रवानगी

BJP Flag

राजस्थान : वृत्तसंस्था – उदयपुर सराडामधील एका भाजप आमदाराने बनावट मार्कशीट दाखल करुन पत्नीला पंचायत निवडणुकीत उभे केले होते. यामुळे या भाजप नेत्याची तुरुंगात रवानगी केली आहे. उदयपूरमधील सलूंबरचे आमदार अमृतलाल मीणा यांनी पत्नीची खोटी मार्कशीट देऊन पंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला होता. पत्नीची बनावट मार्कशीट दाखवून निवडणुकीचा अर्ज भरल्यामुळे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

रक्ताचा टिळा लावून केले प्रेमाचे नाटक; विवाहित तरुणाचे तरुणीवर लैंगिक अत्याचार

Rape

ठाणे : हॅलो महाराष्ट्र – ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने विवाहित असूनही एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याबरोबर लैंगिक संबंध ठेवले आहेत. आरोपी तरुणाने लग्न झाल्याची माहिती तरुणीपासून लपवून तिला लग्नाचे आणि नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर त्याने वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. अनैतिक संबंधातून पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं … Read more

हृदयद्रावक ! लोखंडी पाइपने मारहाण करत जन्मदात्या बापाची हत्या

murder

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडारा जिल्ह्यातील तुमसर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने लोखंडी पाइपने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. या प्रकरणी देव्हाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more