राम शेवाळकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृती स्थळांना विकासनिधी

अमरावती प्रतिनिधी । प्रबोधनकार ठाकरे आणि राम शेवाळकर यांच्या स्मृती स्थळांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये मंजुरी दिल्याने राज्यमंत्री बच्चू कडू यांनी त्यांचे आभार मानलेत. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातील अकोट अंतर्गत येणाऱ्या नरनाळा या ऐतिहासिक किल्ल्याचा विकास कामासाठी सुद्धा २० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर येथील राम शेवाळकर यांच्या वाडा तसेच परतवाड्यातील प्रबोधनकार ठाकरे … Read more

सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर, पिक्चर अजून बाकी आहे! संपूर्ण कर्जमाफीचे बच्चू कडूंनी केलं सूतोवाच

”सध्याची कर्जमाफी हा केवळ ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे” असं सूतोवाच जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विटा येथील कार्यक्रमात एका केलं. दोन लाखांपर्यंतची जी कर्जमाफी आहे. त्यात सर्वच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकत नाही. त्यामुळे दोन लाखांवरील जे कर्जदार शेतकरी आहेत. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे, तसेच जे नियमित कर्ज भरतात. त्यांच्यावरही अन्याय होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी बोललो आहे. त्यांनी हा पहिला टप्पा असून तीन टप्प्यात कर्जमाफी करण्याचा विचार असल्याचं यावेळी बच्चू कडूंनी सांगितलं. विटा येथे आयोजित नागरी सत्कार आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले … Read more

जिल्हापेक्षा तालुकाच मोठा! बच्चू कडूंच्या प्रयत्नातून तालुका क्रीडा कार्यालयानं केलं जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट

मतदारसंघातील अचलपूर तालुका क्रीडा कार्यालयाने आज जिल्हा क्रीडा कार्यालयाला वाहन भेट दीले आहे. त्यामुळे आता “जिल्हापेक्षा तालुकाच मोठा” ही म्हण आज खरी झालेली आहे. अमरावती जिल्हा क्रीडा कार्यालयाला जिल्हाभर खेळांच्या नियोजनासाठी तसेच विविध स्पर्धेवेळी वेळेवर ऊपस्थित राहण्यासाठी स्वतःचे वाहन ऊपलब्ध नव्हते. त्यामुळं जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यक्रमाला ऊशिरा कींवा अनुपस्थित राहत होते.

बच्चू कडू लढणार जालण्यातून लोकसभा, रावसाहेब दाणवेंना देणार टक्कर

Bachhu kadu and Ravsaheb Danve

अमरावती | प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक जालन्यातून लढणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांच्या स्वाभिमानासाठी दानवेंविरोधात जालन्यातून २०१९ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे कडू यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे आता बच्चू कडू विरुद्ध दानवे अशी लढत येत्या लोकसभेला जालन्यात पहायला मिळणार असून कडू दानवेंना जोरदार … Read more