नितेश राणेंच्या वक्तव्यावर तृतीयपंथी समूदाय आक्रमक; त्वरीत अटकेची मागणी

nitesh rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोमवारी नागपूरच्या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘नागपूरला लागलेला कलंक’ अशी जहरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती. यावर भाजपच्या नेत्यांनी देखील आपला संताप व्यक्त करत उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली. यामध्ये  भाजप आमदार नितेश राणे यांचा देखील समावेश होता.नितेश राणे यांनी ठाकरेंवर टीका … Read more

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून; ‘इतके’ दिवस चालणार कामकाज

Maharashtra Legislature

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन पावसामुळे सध्या सर्वत्र गारवा निर्माण झाला असला तरी सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे. अशात आता महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली आहे. यंदाचे पावसाळी अधिवेशन दि. 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. मुंबईत होणारे अधिवेशन 15 दिवस सुरू राहणार आहे. आज … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली ! ‘या’ दिवशी होणार शिंदे-फडणवीस अन् पवार सरकारचा विस्तार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या वर्षभरापासून शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. त्याला आता मुहूर्त सापडला आहे. शिंदे गटातील आणि भाजपचे अनेक आमदार मंत्रिपदाकडे आस लावून बसले असताना अशातच आता राष्ट्रवादीचे 9 आमदार या महायुतीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस ऐवजी आता शिंदे-फडणवीस आणि पवार सरकार असा उल्लेख केला जात आहे. या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

Pankaja Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप? पंकजा मुंडे भाजप सोडणार?

Pankaja Munde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात अजून एक मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे भाजप सोडणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. पंकजा यांनी आज अचानक … Read more

फडणवीसांनी आपल्याच पायावर मोठा दगड टाकून घेतलाय..

Ajit Pawar

थर्ड अँगल । अजित पवार (Ajit Pawar) हे शरद पवारांच्या छत्रछायेखाली वाढलेले आणि जोपासले गेलेले नेतृत्व आहे. शरद पवारांनीच आपला उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांची निवड केल्याने, ते कायम सत्तेत आहेत. साहजिकच इतर नेते, कार्यकर्ते यांच्यात त्यांची दहशत कायम राहिली. दादाच्या विरोधात बोललो तर,ते आपलं राजकीय जीवन बरबाद करतील, अशी कार्यकर्त्यांना साधार भीती असल्याने, जाहीररीत्या कोणी … Read more

समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो, असं लोक म्हणतात

sharad pawar devendra fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावरील बुलढाण्यातील भीषण अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’ वासी होतो असं तेथील लोक म्हणत असल्याचे सांगत पवारांनी फडणवीसांवर बोचरा वार केला आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. शरद पवार म्हणाले, समृद्धी … Read more

मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात!! शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी पहा

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले असून अजूनही सरकारकडून संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याने विरोधकांकडून सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे. येव्हडच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा प्रश्न राज्यातील जनतेला सुद्धा पडलाय. याच दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. येत्या आठवड्यात हा विस्तार … Read more

पंजाबातल्या उलथापालथीची गोळाबेरीज

Panjab Politics Akali Dal and BJP

विशेष लेख । सुहास कुलकर्णी २०२४ च्या निवडणुका जशा जवळ येताहेत तसतसा राजकीय घडामोडींना वेग येतोय. दीड डझन विरोधी पक्षांची एक बैठक नुकतीच पाटण्यात पार पडली. त्या एकजुटीचं वर्णन भाजपने ‘फोटो ऑप मीटिंग’ असं केलेलं असलं, तरी त्या एकजुटीचे काय परिणाम होऊ शकतात, हे भाजपचे चाणाक्ष धुरीण चांगलेच ओळखून आहेत. म्हणूनच त्यांच्यातर्फे देशातील काही पक्षांना … Read more

शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रीपदे? भाजपच्या 2 अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

Eknath Shinde Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन्ही नेत्यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत भाजपच्या 2 कार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार असून त्याजागी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 2 मंत्रीपदे देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत … Read more

विरोधी ऐक्यामागचं अपुरं गृहितक

oppositions leaders in india

विशेष लेख । सुहास कुलकर्णी दीड डझन राजकीय पक्षांची परवा पाटण्यात बैठक पार पडली. या बैठकीतले फार तपशील जाहीर झालेले नाहीत, पण भाजपच्या विरोधकांनी एकत्र लढायचं याच्या आणाभाका घेतल्या गेल्या, एवढं कळलंय. एवढंच ठरवायचं होतं, तर काश्मीरपासून केरळपर्यंच्या नेत्या-मुख्यमंत्र्यांना गोळा कशाला करावं लागलं, असा प्रश्न कुणालाही पडावा. पण राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांची अनुपस्थिती, अरविंद … Read more