अमरावती च्या धामणगावात २१ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई अमरावती च्या धामणगार रेल्वे येथे नागपूर येथून आल्यानंतर ताप आल्याने प्रथम धामणगाव,अमरावती त्यानंतर सावंगी मेघे येथे दाखल केलेल्या एका एकविस वर्षीय तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. शहरातील धवनेवाडी परिसरातील एक तरुणी मागील पंधरा दिवसापूर्वी नागपूर येथून आली होती. ताप खोकला असल्याने ३ मे रोजी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी … Read more

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ७८ हजार पार

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरुच आहे. एव्हाना देशव्यापी लॉकडाऊनला ५० दिवस पूर्ण झाले आहेत. तरी कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढून आता 78 हजार 3 झाली आहे. त्यापैकी 49 हजार 219 लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारानंतर … Read more

कोविड -१९ संसर्गामुळे मृत्यू कशा प्रकारे होतो, हे शास्त्रज्ञांना आढळले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणा-या रोगाची लक्षणे, त्याचे निदान आणि शरीरावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की कोविड -१९ मुळे होणारे मृत्यू मुख्यत: प्रतिकारशक्तीच्या अति-सक्रियतेमुळे होतो. ‘फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी टप्प्याटप्प्याने याबाबतीत वर्णन केले आहे की हा विषाणू श्वसनमार्गास कसा संक्रमित … Read more

चिंता काही कमी होईना! देशात करोनाग्रस्तांचा आकडा ७० हजाराच्या पुढे

नवी दिल्ली । भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण अजूनही कमी होताना दिसत नाही आहे. कोरोनाचा फैलाव गेल्या काही दिवसात वेगात होत असल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. देशातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ६० हजारांची संख्या गाठल्यानंतर आज दोनच दिवसांनी ही संख्या ७० हजारांवर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार ७९३ इतकी … Read more

जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे … Read more

मागील २४ तासांत देशभरात ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक संख्या

नवी दिल्ली । देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक फुगत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाबाधितांची संख्या 67 हजारांच्या पुढे पोहचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 4 हजार 213 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे आतापर्यंतचा एका दिवसातील हा सर्वात मोठा आकडा आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 झाली आहे. गेल्या 24 … Read more

दिलासादायक! देशात २०,९१७ रुग्ण करोनामधून बरे

नवी दिल्ली । भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताच आहे. या वाढत्या रुग्णांच्या संख्येनं आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत आहे. मात्र, देशभरातील आरोग्य यंत्रणांच्याच प्रयत्नानं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असल्याची दिलासादायक माहिती मिळत आहे. देशभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ३१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. संपूर्ण देशभरात २० हजार ९१७ रुग्ण … Read more

राज्यात कोरोनाचा खाकीवर हल्ला आणखी तीव्र; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1000 पेक्षा जास्त

मुंबई । कोरोनाविरुद्ध लढाईत आघाडीवर लढणाऱ्या पोलीस योद्ध्यांवर कोरोनाने आपला हल्ला अधिक प्रखर केला आहे. मागील काही दिवसांत पोलिसांमध्ये कोरोनाच्या संसर्ग वाढल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत तब्बल 1000 पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 113 जण कोरोनातून बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील … Read more

मागील २४ तासात देशभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ; संख्या झाली इतकी

नवी दिल्ली । भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत भर पडत आहे. रुग्ण बरे होत असले तरी नव्या रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत नाही, त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गेल्या २४ तासांत भारतात ४ हजार २१३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर आता भारतात कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार १५२ वर पोहोचली … Read more

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १९,०६३ वर; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात किती रुग्ण

मुंबई । राज्यातील कोरोनावर अजूनही नियंत्रण मिळवता आलं नाही आहे. त्यामुळे दरोरोज मोठ्या संख्येत कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे … Read more