अरे बापरे बाप! जगातील सर्वात खोल सोन्याच्या खाणीत पोहोचला ‘कोरोना’

वृत्तसंस्था । जगभरातील बहुसंख्य देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. या देशात कोरोनाने निवांतपणे हातपाय पसरले आहेत. तेही इतके की जगातील सर्वात खोल असलेल्या सोन्याच्या खाणीत या चिवट कोरोनाच्या विषाणूने शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील या खाणीत काम करणाऱ्या १६४ कामगारांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. ‘पोनेन्ग’ ही सोन्याची खाण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरातील … Read more

धोक्याची घंटा! कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत भारत १० व्या स्थानी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाच्या साथीला रोखण्यात अजूनही यश आलेलं नसून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, काल रविवारी भारताने इराणला मागे टाकलं असून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांच्या यादीत १० व्या स्थानी पोहोचला आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार इतकी झाली आहे. तर मृतांची संख्या ४ हजारावर पोहोचली आहे. यामुळे … Read more

गुजरात म्हणजे ‘टायटॅनिकचं’ बुडणारं जहाज; उच्च न्यायालयाचे रुपाणी सरकावर ताशेरे

अहमदाबाद । देशभरात कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशात गंभीर परिस्थिती तयार आहे. त्यातच महाराष्ट्रामागोमाग गुजरातमध्येही कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. याच परिस्थितीत आता अहमदाबाद येथील सिव्हिल रुग्णालयातील दुरावस्था पाहता गुजरात उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. राज्यातील कोरोना नियंत्रणासोबतच रुग्णांना उपचार मिळण्याविषयीची जनहित याचिका गुजरात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणी करतेवेळी … Read more

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण; उपचारांना तात्काळ सुरुवात

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लिहलं कोविड योद्ध्यांना भावनिक पत्र

मुंबई । महाराष्ट्रावर आलेल्या कोरोनाच्या संकटात आज डॉक्टर पोलीस, नर्स, सफाई कामगार आणि इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र देशाची सेवा करत आहेत. या कोविड योद्ध्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय हे युद्ध आपल्याला शस्त्राने … Read more

धक्कादायक! राज्यात २ दिवसांत २८८ पोलिसांना लागण; कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या १६६६

मुंबई । राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाच्या लढ्यात आघाडीवर असणाऱ्या पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत आहे. पोलिस दलातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १,६६६ पर्यंत पोहोचला असून २ दिवसांत तब्बल २८८ पोलिसांनी कोरोनाची लागण झाल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत १६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात पोलीस खूप महत्वाची … Read more

देशात मागील २४ तासांत 6 हजार 654 कोरोनाग्रस्त, 137 मृत्यू

नवी दिल्ली । देशातील कोरोना संकटाची परिस्थिती अजून चिंताजनकच आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ कमी होताना दिसत नाही आहे. देशभरात मागील २४ तासांत 6 हजार 654 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन, 137 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या 1 लाख 25 हजार 101 वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. … Read more

इटालियन फुटबॉल क्लब जुव्हेंटसच्या टीमचा कोविड-१९ चा रिपोर्ट आला निगेटिव्ह,आता सरावास सुरुवात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीच्या फुटबॉल क्लब जुव्हेंटसने म्हटले आहे की,” त्यांच्या सर्व खेळाडूंचा कोविड-१९ चा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसांत ते मोठ्या गटात सराव सुरु करतील. जुव्हेंटस क्लबने आपल्या एका निवेदनात म्हटले आहे की, “इटालियन फुटबॉल महासंघाच्या (एफआयजीसी) वैद्यकीय वैज्ञानिक आयोगाकडून परवानगी आल्यानंतरच संपूर्ण संघाची काल कोविड -१९ ची … Read more

राजकारण सुरु! राजस्थान सरकारनं पाठवलं यूपी सरकारला विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल

लखनऊ । संपूर्ण देश कोरोनाच्या संकटतात असताना याही काळात राजकीय पक्षांनी राजकारणाला विश्रांती दिली नाही. लॉकडाउनमुळे राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना काँग्रेसच्या नेतृत्वातील राजस्थान सरकारने उत्तर प्रदेशात बसेसद्वारे सोडले. राजस्थान सरकारने याचे ३६ लाख ३६ हजार इतके भाडे आकारले. तर उत्तर प्रदेश सरकारने हे भाडे शुक्रवारी चुकते केले. दरम्यान, आता या बिल प्रकरणावरून … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! सर्व खासगी रुग्णालये घेणार ताब्यात

मुंबई । राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेली सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारनं दिले आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा … Read more