शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार, देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत गंभीर आरोप

मुंबई | शालेय पोषण आहार, धानखरेदी, आश्रमशाळा वस्तुखरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून, विशिष्ट कंपनी, नेत्यांना फायदा मिळण्यासाठी हा संपूर्ण गैरव्यवहार केला असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुराव्यासह विधानसभेत केला. 2020-21 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर ते विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले की, शालेय पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार होत आहे. विशिष्ट व्यक्तींना … Read more

‘हा कुठला अर्थसंकल्प हे तर केवळ राजकीय भाषण होतं!’- देवेंद्र फडणवीस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यांनतर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारनं आज विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हे केवळ पोकळ राजकीय भाषण आहे अशी … Read more

अजित पवारांनी दिला राजकारण सोडून लेखक होण्याचा फडणवीसांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीस यांना टोले लगावले. ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे देवेंद्र फडणवीस यांचं पुस्तक पाहिलं तर फडणवीस हे उत्तम साहित्यिक होऊ शकतात … Read more

देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतील कामाला शुभेच्छा; जयंत पाटलांचा टोला

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी केलेल्या विधानामुळे आम्हाला आनंद झाला. देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षनेते राहणार नाहीत, हे यातून स्पष्ट होत आहे. त्यांच्या दिल्लीतील कामाला शुभेच्छा आहेत, अशी खोचक प्रतिक्रिया जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट … Read more

वारिस पठाण यांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, भारतात १००कोटी हिंदू राहतात म्हणून अल्पसंख्याक सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्येएका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं. वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलंच पेटलं आहे. अशावेळी राज्याचे माजी … Read more

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मिळाला जामीन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक शपथपत्रात दोन फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणातील सुनावणीसाठी फडणवीस नागपूर सत्र न्यायालयात हजर झाले होते. कनिष्ठ न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. ३० मार्च रोजी पुढच्या सुनावणीसाठी हजर रहावे लागणार आहे. … Read more

केवळ राज्यातच कशाला? संपूर्ण देशात मध्यावधी निवडणूक घ्या; पवारांचे भाजपला प्रतिआव्हान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या, जनता कोणाच्या बाजूनं आहे ते कळेल’, असं आव्हान महाविकास आघाडी सरकारला केलं होत. फडणवीसांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चोख उत्तर देत खुलं आव्हान दिलं आहे. ”केवळ राज्यातच कशाला? … Read more

वाढत्या वजनामुळं फडणवीसांनी टाळला रबडी, कुल्फीचा मोह; नेमका काय आहे किस्सा

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढत्या वजनामुळं एका कार्यक्रमात मनावर दगड ठेवत रबडी, कुल्फीचा मोह टाळला. याबाबतची जाहीर कबुली खुद्द फडणवीस यांनी एका कार्यक्रमात दिली. ही घटना आहे पिंपरी-चिंचवडमधील.

पक्षाला काडया करणारे कार्यकर्ते नको, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत – नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “पक्षाला इकडून तिकडे जाणारे,गटबाजी करणारे, काड्या करणारे लोकं नको तर निष्ठावंत कार्यकर्ते हवेत, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते भाजपचे निष्ठवंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आनंदराव ठवरे … Read more

भाजपा सरकारच्या काळातील वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

भाजपा सरकारच्या काळात वरिष्ठ नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारनं घेतली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या घटनेची चौकशी सुरू केल्याचं सांगितलं आहे. फोन टॅपिंग संदर्भात एक नियमावली आहे. ही नियमावली तोडून काही घडलं आहे का किंवा कुणाच्या परवानगीने हे झालंय का याची चौकशी राज्य सरकारने सुरू केली असल्याचं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सांगितलं.