कटप्पाने बाहुबलीला का मारलं, याचं उत्तर समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है – जयंत पाटलांनी भाजपला फटकारले

Jayant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कटप्पा को बाहुबली ने क्यू मारा हे समजलं नाही पण टायगर अभी जिंदा है अस … Read more

‘कोणी पद देत म्हणून नाथाभाऊ पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही’ – एकनाथ खडसे

मुंबई । “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले. आज आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे या पार्श्ववभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. … Read more

लालदिव्या’साठीच नाथाभाऊनी प्रदेशाध्यक्षपद नाकारलं आणि त्यामुळेच त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं ; दानवेंचा गौप्यस्फोट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक राजकिय प्रतिक्रिया उमटल्या असून काही भाजप नेत्यांनी खडसेंवर निशाणा देखील साधला आहे. पक्षात एकेकाळी केवळ नाथाभाऊंकडेच लालदिव्याची गाडी होती. त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यपदाची ऑफर देण्यात आली होती. पण तब्येतीचं कारण सांगून त्यांनी … Read more

पक्ष सोडण्याची पाळी का आली याचे आत्मचिंतन खडसेंनीच करावे ; गिरीश महाजनांचा घणाघात

Khadase and Mahajan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. भाजप सोडताना खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी छळ केल्यामुळे पक्ष सोडल्याचा खुलासा खडसेंनी केला. यावर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केले असून खडसेंचा हा कांगावा अत्यंत चुकीचा असून … Read more

एकनाथ खडसे आज बांधणार घड्याळ ; शरद पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादीत प्रवेश

sharad pawar and khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 40 वर्षांपासून ज्या नेत्याने महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने भाजपचा प्रचार केला, ज्यांनी भाजप वाढवली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाला बळ दिले ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यापूर्वीच … Read more

….म्हणून ‘राष्ट्रवादी’ मध्येच प्रवेश करण्याचा निर्णय घेतला ; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. परंतु नवीन पक्ष निवडताना राष्ट्रवादी काँग्रेसच का निवडला असा प्रश्न विचारला असता खडसे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. खडसे म्हणाले की, मला वाटलं राष्ट्रवादीत जावं, म्हणून हा निर्णय घेतला. या निर्णयाआधी मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. … Read more

….त्यामुळे भाजप मध्ये अस्वस्थता वाढली आहे – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्याच ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावर भाष्य करताना नाथाभाऊ सारख्या जेष्ठ नेत्याची जी अवहेलना झाली ती त्यांना सहन झाला … Read more

‘विधानसभेला भाजपने तिकीट नाकारल्यावर राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता,’ पण..

मुंबई । ‘विधानसभा निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘विधानसभेत जेव्हा मला तिकीट पक्षाकडून नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून … Read more

भाजपमध्ये होणार राजकीय भूकंप !! 10-12 आमदार माझ्या संपर्कात ; खडसेंचा दावा

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्याच ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राजीनाम्या मुळे भाजपात खळबळ उडाली आहे. त्यातच माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. … Read more

एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है ; हसन मुश्रीफ यांचे सूचक वक्तव्य

Hasan mushrif

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सगळीकडे राजकिय खळबळ उडाली आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही त्यावर सूचक विधान केलं आहे. ‘एकनाथ खडसे सिर्फ झांकी है, अभी बहुत कुछ बाकी है’, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपमधील आणखी काही नाराज … Read more