जालन्यात आणखी एक जवानाचा किरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १४ वर

जालना प्रतिनिधी | जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या आणखी एक जवानाचा अहवाल आज मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता चौदावर पोहचली आहे अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. जालना जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णापैकी एक,दोन रुग्ण वगळले तर बहुतांशी रुग्ण हे बाहेर जिल्हे … Read more

गुटखामाफियाच्या शेतातील वाड्यात सापडला अवैध गुटख्याचा मोठा साठा; 15 लाखाचा मुद्देमाल जप्त

जालना प्रतिनिधी । जिल्ह्यातील राजूर येथे एका गुटखा माफियांच्या वाड्यात गुटख्याचा मोठा साठा सापडला आहे. जालना पोलिसांनी कारवाई करून 9 लाखाचा गुटखा, एक टेम्पो, दोन मोटारसायकलीसह 15 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे जालना परिसरातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, सदर प्रकाराबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली होती. त्यानंतर … Read more

रेडझोन औरंगाबादेतून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांचेही निलंबन होणार का?

जालना प्रतिनिधी । जिल्हाधिकाऱ्यांनी खोटारडेपणा उघडकीस आणलेल्या बदनापूरच्या गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली असून तीन दिवसात खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांनी परवानगीशिवाय जिल्ह्यांच्या सीमा ओलांडू नयेत अशा सूचना असतानादेखील बदनापूरचे गटविकास अधिकारी व्ही.एन.हरकळ हे रेड झोन असणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातून अपडाऊन करून जालना वासियांचे आरोग्य … Read more

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’; रावसाहेब दानवे यांच्या वाचाळगिरीचा कथित विडिओ व्हायरल

‘मी असेपर्यंत खुशाल गायी कापा’ असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांचे प्रचार सभेतील एक भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात मी असेपर्यंत बिनधास्त गोहत्या करा असे वक्तव्य करताना ते दिसत आहेत. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात प्रचार करताना दानवे असं बोलले होते असे समजत आहे. या संदर्भातली एक व्हिडीओ क्लीपही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

लाखो रुपये असलेली बॅग फेकून सहाय्यक निबंधकाचा पोबारा

जालना प्रतिनिधी । अंबड शहरातील रजिस्ट्री ऑफिस कार्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक निबंधक आपल्या कार मध्ये कापडी बॅग ठेवत असताना बॅग मधून पैशाचे बंडल खाली पडल्याने त्यांना पैशाची बंडल खाली पडल्याची विचारणा केली असता साह्यक निबंधकाने पेशाने भरली बॅग तशीच खाली फेकून पळ काढल्याची घटना अंबड शहरात निबंधक कार्यालयाच्या आवारात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more

जिल्ह्यामधील प्रत्येक गाव हे पक्क्या आणि मजबुत डांबरी रस्त्याने जोडण्याचा मानस – पालकमंत्री बबनराव लोणीकर

Babanrao Lonikar

जालना । सतिश शिंदे जिल्ह्यातील प्रत्येक गाव पक्क्या व मजबुत डांबरी रस्त्याने जोडणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. परतूर तालुक्यातील वलखेड येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामांचा शुभारंभ आज त्यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री श्री.लोणीकर म्हणाले की, आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्त्यांचे आराखडे तयार करण्याचे निर्देश यापुर्वीच दिले होते. गेल्या तीन वर्षात … Read more

दुष्काळाशी सामोरे जाण्यासाठी यंत्रणांनी अतिशय संवेदनशील रहावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvus

जालना | सतिश शिंदे येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा नियोजनाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीतील उपाय योजनांचा व शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित … Read more

देवी रडल्याचा चमत्कार, महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला पर्दाफाश…!

Ganesh Festival

जालना | शहाजी भोसले सध्या महाराष्ट्रभर गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. गौरी गणपतीच्या या सणादरम्यान जालना जिल्ह्यात अजब प्रकार घडला आहे. भोकरदन येथे चक्क देवी रडल्याचा चमत्कार घडल्याचे बोलले जात आहे. मात्र महाराष्ट्र अंनिस च्या कार्यकर्त्यांनी देवी रडण्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश केल अाहे. हाती आलेल्या माहितीनुसार, भोकरदन येथे चंचल वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरी महालक्ष्मी मूर्तींची … Read more