शेतातील घास गवत उपटल्याने पोलिस हवालदाराला खुरप्याने मारहाण

Karad Police

कराड | कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे शेतातील गवत उपटल्याच्या कारणावरुन पोलीस हवालदाराला खुरप्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलीस हवालदार कृष्णा बाबु काकडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शंकर जगन्नाथ काकडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कराड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार … Read more

मर्चंट नेव्हीत भरतीच्या आमिषाने युवकांची 10 लाखांची फसवणूक

Karad Police

कराड | मर्चंट नेव्हीमध्ये भरती करण्याचे अमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाणेतील दाम्पत्यासह सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी निलेश लालासाहेब शेवाळे (रा. शेवाळवाडी-म्हासोली, ता. कराड) याने याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. त्यानुसार भिमराव चौगुले (रा. पणुंब्रे, ता. शिराळा, जि. सांगली), … Read more

स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात? : कराडला मराठा क्रांती मोर्चाकडून श्रध्दाजंली सभा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण प्रश्नासाठी आयुष्यातली एक दोन नव्हे तर तब्बल 40 वर्षे पणाला लावलेल्या व आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत मराठा आरक्षण प्रश्नासाठीच संघर्ष करणारे एकमेव मराठा आमदार स्व. विनायकराव मेटे हे आहेत. तेव्हा मराठा समाज आज हरपला आहे, त्यामुळे स्व. विनायक मेटे यांचा घातपात की अपघात यांची उच्चस्तरीय चाैकशी व्हावी, अशी मागणी … Read more

स्वाध्याय परिवाराचे वृक्ष संवर्धनात मोठे काम : डॉ. महेश खुस्पे

कराड | स्वाध्याय परिवाराचे वृक्ष संवर्धनात मोठे काम आहे. यापूर्वी स्वाध्याय परिवाराने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे जतन केले आहे. वृक्षात देव पाहून त्याचे जतन करणे हे भगवंताचे पूजनच आहे. अशी शिकवण स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांनी दिली. या भावनेतूनच परिवारातील सदस्य वृक्षाचे जतन करण्यासाठी परिश्रम घेत असतात प्रतिपादन कराड येथील कोटा ज्युनिअर … Read more

भाजपाची तिरंगा बाईक रॅली : कराडात आ. जयकुमार गोरे, अतुल भोसलेंची उपस्थिती

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ या अभियानाची जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराड शहरात आज भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीचा शुभारंभ हुतात्मा स्मारकात हुतात्मा स्तंभास अभिवादन करुन करण्यात आला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, डाॅ. अतुल भोसले यांच्या उपस्थितीत कराड शहरातील विविध भागातून … Read more

हातात तिरंगा घेऊन पृथ्वीराज चव्हाणांची गावागावांतून पदयात्रा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त काँग्रेस पक्षाकडून आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेची सुरुवात शहरातील महात्मा गांधी पुतळ्याला अभिवादन करून झाली. यानंतर हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. पदयात्रा चचेगाव, विंग, कोळे, कोळेवाडी, पोतले किरपे मार्गे तांबवे येथे पूर्ण करण्यात आली. या यात्रेचा कराड … Read more

कराड जनता बॅंक : बोगस कर्जप्रकरणात अध्यक्ष, जिल्हा उपनिबंधकासह 27 जणांवर गुन्हा

Karad Janata Bank

कराड | कराड जनता बँकेने कर्मचार्‍यांना दिलेल्या कर्जप्रकरणात बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्यासह तब्बल 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँकेच्या कर्ज व्यवहारांची ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. त्यातच कर्मचार्‍यांच्या कर्ज प्रकरणाचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्याने या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदेशीर नियमांचा भंग, फसवणूक, बनावट … Read more

भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन

कराड | राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी आज सकाळी कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. रोहित पवार हे आपल्या वडिलांसोबत कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबाच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी कराडला थांबून यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केलं. भर पावसात रोहित पवारांकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. तसेच … Read more

कोरेगावला तहसिल, पोलिसांच्या कार्यालयात पाणी घुसले

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव शहरात सायंकाळी जवळपास दीड ते पावणे दोन तास पडलेल्या जोरदार पावसामुळे कोरेगाव तहसील व पोलीस प्रशासनाच्या कामकाज चालणाऱ्या विविध कार्यालयीन खोल्यात पावसाचे पाणी घुसले. शासकीय कार्यालय परिसरात गुडघा भर पाणी साचले होते. तर कराड शहरातही दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने नव्या प्रशासकीय इमारतीमधील पार्किंगमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना कसरत करावी … Read more

कराडला अभियांत्रिकी शिक्षकांची मागण्यांसाठी निदर्शने

कराड | आश्वासित प्रगत योजने (CAS) अंतर्गत मिळणाऱ्या लाभापासून अभियांत्रिकी शिक्षकांना वंचित ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने काढलेला दिनांक 3 जून 2022 रोजीचा आदेश (GR) हा सर्व अभियांत्रिकी शिक्षकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेने संपूर्ण महाराष्ट्रभर मेटा ने … Read more