आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नोकरी करत असलेल्यांना आता ऑफिस मध्ये अधिक वेळ घालवायाची तयारी करावी लागू शकते. कारण भारत सरकार कामकाजाची वेळ दिवसाच्या ८ तासांवरून १२ पर्यंत वाढवण्याचा विचार करीत आहे.हा लॉकडाउन २ चा परिणाम असू शकतो. भारतात लॉकडाऊनमुळे सध्या मजुरांची कमतरता भासत आहे,त्यामुळे दररोजच्या मालाची मागणी वेगाने वाढली आहे. म्हणूनच सरकार त्यात बदल करण्याचा … Read more

कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल … Read more

लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी कोल्हापूर पोलिसांचा अनोखा सेल्फी पॉईंट

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाच्या संसर्गापासून जनतेला वाचवण्यासाठी सरकार, प्रशासन वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहे. मात्र, तरीही काही बेजबाबदार महाभाग घराबाहेर हिंडताना दिसत आहे. अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी लाठी प्रसादाचे वाटपही करून पहिले पण काही जण सुधारतांना दिसत नाही आहेत. त्यावर आता … Read more

लॉकडाऊनमुळे आयपीएल अनिश्चीत काळासाठी लांबणीवर

मुंबई । देशभरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर टाकली होती. केंद्र सरकार लॉकडाउन संदर्भात नेमकं काय निर्णय घेतंय हे पाहून स्पर्धा कधी खेळवली जाईल याचा निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशभरात लॉकाडउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्याचं जाहीर केलं. त्यामुळे … Read more

रेल्वेला अजूनही रेड सिग्नलच; प्रवासी वाहतूक ३ मेपर्यंत बंद

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा ३ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत … Read more

मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more

शेतकर्‍यांसाठी सरकारची नवी सुविधा, ‘हा’ फोन नंबर करणार लाॅकडाउनमध्ये शेती समस्यांचे निराकरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ लॉकडाऊनमधून शेतीशी संबंधित कामांना सूट दिल्यानंतरही वाहतूक व्यवस्था ही शेतकर्‍यांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी धान्य किंवा भाजीपाल्याची वाहतूकच होत नाही आहे.अनेक राज्यांत एकीकडे भाजीपाला शेतीतच सडलाय तर दुसरीकडे शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना महागड्या दराने मिळतोय.ही समस्या सोडविण्यासाठी मोदी सरकारने आता पुढाकार घेतला आहे. राज्यांमधील शेतमालाच्या वाहतुकीची … Read more

भारतीयांच्या जीवापुढे अर्थव्यवस्थेचं नुकसान काहीच नाही- पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. यावेळी बोलताना मोदींनी लॉकडाऊनचा अर्थव्यवस्थेला बसत असलेला फटका आणि सामान्यांना सहन कराव्या लागणाऱ्या अडचणींचा उल्लेखही केला. “आर्थिक स्तरावर मोठे नुकसान झालं … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

सोनिया गांधींचे मोदींना भावनिक पत्र; म्हणाल्या हातावर पोट असलेल्यांची काळजी घ्या

वृत्तसंस्था । देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्व छोटे-मोठे उद्योग बंद आहते. याचा सर्वात जास्त विपरीत परिणाम हातावरचं पोट असलेल्या सगळ्यांवर होत आहे. रोज कमावून खाणाऱ्या अशा लोकांना आता दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. तेव्हा लॉकडाऊनच्या कालावधीत अशा सगळ्या लोकांची काळजी घ्या, या आशयाचं पत्र काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया … Read more