ओमिक्रॉनमध्ये व्हायरल लोड खूप कमी असूनही ते डेल्टापेक्षा वेगाने पसरत आहे, असे का हे समजून घ्या

Corona

नवी दिल्ली । कोरोना व्हायरस ओमिक्रॉनच्या नवीन व्हेरिएन्टमुळे जगभरात कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. भारतात दैनंदिन रुग्णांची संख्या 3 लाखांच्या पुढे गेली आहे. Omicron व्हेरिएन्टबाबत अजून संशोधन चालूच आहे. दरम्यान, ओमिक्रॉनवरील संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की ओमिक्रॉन आणि डेल्टा यांचे व्हायरल लोड जवळजवळ सारखेच आहे. मात्र हा व्हेरिएन्ट डेल्टापेक्षा जास्त व्हायरल लोड … Read more

क्रुडच्या किंमती सात वर्षांच्या उच्चांकावर, आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारला करावी लागणार कसरत

Crude Oil

नवी दिल्ली । जागतिक राजकारणातील खळबळ आणि ओमिक्रॉन या कोरोना व्हेरिएन्टबाबतच्या कमी चिंतेमुळे कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल $87 वर पोहोचला आहे, जो 7 वर्षातील सर्वोच्च पातळी आहे. कच्च्या तेलात वाढ होत असलेला हा सलग पाचवा आठवडा आहे. ऑक्टोबर 2014 पासून कच्च्या तेलात झालेली ही विक्रमी वाढ आहे. … Read more

जानेवारीमध्ये FPI ने आतापर्यंत केली आहे 3117 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । भारतासह जगभरात ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमधील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कायम आहे. सलग तीन महिन्यांच्या विक्रीनंतर, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जानेवारी 2022 मध्ये आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 3,117 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, FPIs ने जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात 3,202 … Read more

सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 अधिवेशनाचे वेळापत्रक, तारीख, वेळ कसा असेल हे जाणून घ्या

नवी दिल्ली । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी रोजी दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू होईल आणि 8 एप्रिल रोजी संपेल. पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संसदीय कामकाजावरील कॅबिनेट समितीच्या शिफारशीचा हवाला देत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी 2022 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2022 देशासमोर ठेवला जाईल. सत्राचा पहिला … Read more

वित्तीय तूट म्हणजे काय? त्याचा अर्थसंकल्पाशी काय संबंध आहे ते समजून घ्या

Share Market

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला 2022 23 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. देशातील जनतेला अनेक सुविधा देण्यासाठी अर्थसंकल्प सादर केला जातो. ज्यामध्ये जनतेच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. अर्थसंकल्प सादरीकरणाचा दिवस हा वर्षातील तो दिवस असतो जेव्हा लोकं वित्तीय तूट, निर्गुंतवणूक, भांडवली नफा कर, पुनर्भांडवलीकरण यासारखे शब्द ऐकतात. यातील … Read more

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोविड टास्क फोर्सच्या प्रमुखांचा 3 गोष्टींवर भर

Corona

नवी दिल्ली । कोविड-19 वरील सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गटाचे (NTAGI) प्रमुख डॉ. एन.के. अरोरा यांनी मंगळवारी IIT च्या त्या कोरोना मॉडेलच्या अंदाजाला योग्य असल्याचे सांगितले, ज्यात नवीन व्हेरिएन्ट ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट येईल असे म्हटले गेले होते. ही लाट जानेवारीमध्ये शिखरावर पोहोण्याची शक्यता आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना NTAGI च्या कोविड-19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष अरोरा म्हणाले, … Read more

धक्कादायक ! ‘या’ मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  मिरज शासकीय मेडिकल कॉलेजचे 56 विद्यार्थी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा दिल्लीतील लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुण्यातील लॅबचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आला होता. मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात 48 मुली कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या. अन्य काहींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी पुन्हा 34 जण पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पुन्हा 10 विद्यार्थी … Read more

सावधान!! बुस्टर डोसच्या नावाखाली मागितला जात आहे ओटीपी; बँक खाते होईल रिकामे

नवी दिल्ली । देशात सायबर गुन्हेगारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ही फसवणूक करणारी लोकं अनेक नवनवीन मार्गाने लोकांना आपल्या फसवणुकीचे बळी पाडत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत आता या सायबर गुंडांनी कोरोनाच्या बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक सुरू केली आहे. बुस्टर डोस मिळवण्याच्या नावाखाली या गुंडांनी लोकांना आपला बळी बनवण्यास सुरुवात केली आहे. बूस्टर डोससाठी रजिस्ट्रेशन … Read more

‘या’ शहरातील कबड्डी आयोजकांवर गुन्हा दाखल, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा ठपका

सांगली । प्रथमेश गोंधळे । सांगलीवाडीतील चिंचबाग मैदानावर कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले असतानाही आदेशाचे उल्लंघन करत कबड्डीचे सामने भरविल्या प्रकरणी आयोजकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत 700 ते 800 जणांचा जमाव जमवून स्पर्धा घेतल्या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले आहेत. शशिकांत गणपती फल्ले आणि … Read more

ओमिक्रॉन सौम्य की गंभीर? या नवीन व्हेरिएन्टबाबत WHO तज्ञांचे नवीन मत जाणून घ्या

नवी दिल्ली । कोविड-19 च्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमुळे देशात तिसरी लाट आली आहे. गुरुवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 17 हजारांहून जास्त रुग्ण आढळले. ओमिक्रॉन केसेसचा प्रभाव जगभरात दिसून येत आहे, त्यानंतर या नवीन व्हेरिएन्टबाबत तज्ज्ञांचे मतही बदलू लागले आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की,”ओमिक्रॉन हे सौम्य व्हेरिएन्ट म्हणून हल्ल्यात घेणे ही एक मोठी चूक … Read more