बारामतीत धक्कादायक प्रकार : महिलेला सैतानाचा अवतार म्हणत नग्न करून बळी देण्याचा प्रकार

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात अंधश्रध्देचे अघोरी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरच्या चारजणांसह मात्रिकांवरही गुन्हा बारामती पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. घरातील महिलेला सैतानाचा अवतार समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करण्यात येवून अघोरी कृत्य करून तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने बारामती तालुका हादरला आहे. बारामती तालुक्यातील करंजेपूल … Read more

अनैतिक संबधातून लेफ्टनंट कर्नल महिलेची आत्महत्या : अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची बिग्रेडियरची धमकी

Crime D

पुणे | पुण्यातील मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या लेफ्टनंट कर्नल महिलेशी अनैतिक संबंध ठेवत, अश्लील फोटो व व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत ब्रिगेडियरने या महिलेला ब्लॅकमेल केल्यानेच लेफ्टनंट कर्नल असलेल्या महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या महिलेचे पतीही जयपूर येथे लष्करी सेवेत असून या घटनेनंतर ते पुण्यात आल्यावर त्यांनी … Read more

औरंगाबादचा ‘नमामि गंगा’ योजनेत समावेश

औरंगाबाद – गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी केंद्र शासनाने ‘नमामि गंगा’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गंत गंगा नदीपात्राच्या आसपास असलेल्या शहरांचाच समावेश करण्यात आला होता. विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील दोन शहरांची सोमवारी निवड करण्यात आली. यामध्ये पुणे आणि औरंगाबादचा समावेश केल्याची माहिती महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली. लवकरच ५० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) … Read more

बिग बाॅस फेम सातारचा अभिजीत बिचकुले सध्या पुण्यात काय करतोय?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी स्वत:ला कवी मनाचा नेता म्हणवून घेणाऱ्या अभिजीत बिचुकलेनं आत्तापर्यंत अनेक निवडणुका लढवल्या मात्र राजकीय क्षेत्रात यश न मिळू शकल्याने आता त्याने नवा वाटेवर वाटचाल सुरू केलेली आहे. अभिजीत बिचकुलेने नुकताच त्याने पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. बिग बॉसच्या दुसऱ्या सिजनचा स्पर्धक पराग कान्हेरे याने नुकतीच ही … Read more

रंगलेल्या गालाचा मुका : प्रवीण दरेकरांच्या विरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Rupali chakankar

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष आहे, असं म्हटलं होतं. या विधानावरून विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली यांनी तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील सिंहगड पोलीस ठाण्यात दरेकर यांच्या विरोधात कलम 509 नुसार तक्रार दाखल केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये एका कार्यक्रमात … Read more

स्टेशन परिसरात फूटपाथवर झोपलेल्या 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, पुण्यामधील घटना

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुणे स्टेशन परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. पुण्यातील 39 वर्षांच्या रिक्षावाल्याने या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. या आरोपी नराधमाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हि अल्पवयीन पीडित मुलगी रस्त्याच्या कडेला आपल्या आई शेजारी झोपलेली असताना या … Read more

पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने केली बॉयफ्रेंडची हत्या

Murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये गर्लफ्रेंडनेच आपल्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी गर्लफ्रेंड स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. रागाच्या भरात तिनं बॉयफ्रेंडची गळा दाबून हत्या केली आहे. सतत किरकोळ गोष्टीवरुन होणाऱ्या वादामुळे तिनं रागाच्या भरात हे टोकाचं पाऊल उचललं. पुण्यातल्या भेकराईनगरमध्ये ही घटना घडली आहे. मृत … Read more

भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला संरपंचाच्या कानशिलात लगावून केला विनयभंग

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील कदम-वाकवस्ती या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या महिला सरपंचाला कानशिलात मारून त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुजित सुभाष काळभोर असे आहे. या प्रकरणी … Read more

एकनाथ खडसेंची ‘इतक्या’ कोटींची संपत्ती ED कडून जप्त; लोणावळा, जळगावातील मालमत्तेचा समावेश

Eknath Khadse

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने धक्का दिला आहे. ईडीने खडसे यांची कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये जळगाव आणि लोणावळा येथील मालमत्तेचा समावेश आहे. Maharashtra | Enforcement Directorate seizes properties of NCP leader Eknath Khadse located in Lonavala and Jalgaon in connection with the Bhosari MIDC land … Read more

संतापजनक ! भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या

पुणे : हॅलो महाराष्ट्र – भावासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. हि घटना पुण्यातल्या वाघोली इथल्या मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कॅम्पमध्ये घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पहाटे हि घटना घडल्याने लेबर कॅम्पमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे अनु राजू मिर्झा … Read more