एनसीबी आता नमो कंट्रोल ब्यूरो झाली; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनसीबी आणि भाजपवर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. एनसीबी ही नमो कंट्रोल ब्यूरो झाली आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी 24 सप्टेंबर 2020 रोजी आपला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आता हा व्हिडीओ पुन्हा एकदा शेअर करत त्यांनी भाजपवर टीका … Read more

राजीव गांधी देशाचे हिरो, मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांचे स्थान हलणार नाही; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद यांच्या नावाने करण्याचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतल्यानंतर काँग्रेसकडून मोदींवर निशाणा साधला जात आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावरून नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला … Read more

जलयुक्त शिवार योजना ही झोलयुक्त शिवार योजनाच होती; काँग्रेसचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप सरकारच्या काळात सुरु झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी एसीबी कडून करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. यापूर्वी कॅगने देखील या योजनेत भ्रष्ट्राचाराचा ठपका ठेवला होता. महाविकास आघाडी सरकारने याची दखल घेत माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला … Read more

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी ७ वर्षांत जे प्रयत्न झाले त्याचा हा एक भाग; काँग्रेसचा मोदींवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचं व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेल्यांनतर त्यांनी कंपनीचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवण्याचा निर्णय निर्णय घेतला. इतकच नव्हे तर अदानी समूहाच्या काही कर्मचाऱ्यांनी गरबा खेळत आनंद साजरा केल्याचे देखील समोर आले. याप्रकरणी मनसेने अदानी समूहाला इशारा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील यावर भाष्य करत थेट … Read more

फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड झालं का? काँग्रेसकडून चौकशीची मागणी

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण तापलं असून याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. कारण महाराष्ट्रात याआधिच फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव … Read more

अनिल देशमुख प्रकरण: त्या बारमालकांना अद्याप अटक का नाही; काँग्रेसचा ईडीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी थेट ईडीला च काही सवाल केले आहेत. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणांचा वापर हा विरोधी पक्षांना अडचणीत आणण्यासाठी व त्रास देण्यासाठी करण्यात येत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केंद्र … Read more

मोदी सरकारला मुघलांच्या इतिहासाची अ‍ॅलर्जी ; काँग्रेसची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे तो म्हणजे इतिहासाच्या पदवीच्या अभ्यासक्रमातून भरत देशावर ज्यांनी आक्रमण केले आहे. त्या मुघलांचा इतिहास येथून पुढे अभ्यासक्रमात सहभागी करायचा नाही. आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर आता राजकीय लोकांकडूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज महत्वाचे ट्विट करीत मोदी … Read more

आता चंद्रकांत पाटील तुम्ही जनतेची जाहीर माफी मागा : काँग्रेसने सुनावले खडे बोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने धार्मिक कार्यक्रम घेण्यावरती निर्बध घातले. त्यामुळे आता महाराष्ट्रात आषाढी एकादशीची वारीही राज्य सरकारने रद्द केली. या सरकारने घेतलेल्या निर्णयावरून भाजपमधील अनेक नेत्यांकडून टीका करण्यात आली. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत … Read more

राज्यात सरकार बदलल्याने अण्णा ७ वर्षांच्या कुंभकर्णीय निद्रेतून खडबडून जागे झाले; काँग्रेसचा हल्लाबोल

anna hajare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांच्या मामाचा कारखाना असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडी ने कारवाई केल्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे. यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत … Read more

फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द; काँग्रेसचा घणाघात

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ओबीसी आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण गरम झालं आहे. याच पार्श्वभूमीवर माझ्या हातामध्ये सूत्रं दिल्यास ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देईन अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न हे भाजपचं पाप असून फडणवीस आणि फसवणूक हे समानार्थी शब्द … Read more