‘त्या’ मुलीला न्याय हा नक्की मिळेल! पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी रोहित पवारांची सूचक प्रतिक्रिया

अहमदनगर । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून (Pooja Chavan Suicide Case)राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येताच शिवसेनेच्या अडचणीत वाढत आहेत. भाजपनं पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लावून धरत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलं आहे. भाजपकडून संजय राठोडांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यावर … Read more

संजय राठोड मीडिया ट्रायलचे बळी- विजय वडेट्टीवार

चंद्रपूर । पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी चंद्रपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय राठोड (Sanjay Rathod) यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती असल्याचेही ते म्हणाले. ”भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता … Read more

संजय राठोड यांची नियमानुसार चौकशी होणार; गृहमंत्र्यांचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणी विरोधक करत असलेला आरोप चुकीचा आहे. वन मंत्री संजय कराठोड यांची नियमानुसार चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशीत जे काही समोर येईल, त्यानंतर राज्यशासन निर्णय घेणार आहे.”  असं आज(सोमवार) राज्याचे … Read more

पर्यावरणमंत्र्यांची ‘दिशा’ चुकली मग आता वनमंत्री ‘पूजा’ घालण्याच्या लायकीचे राहिले नाहीत- नितेश राणे

मुंबई । पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरे सरकारमधील एक मंत्री संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यावरुन भाजपनं ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनीही संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केला आहे. तसंच, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: संजय राठोडांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया आहे. सदर प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी होईल. त्यानंतर गरज असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गेल्या काही काळात लोकांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न होत असल्याचे काही प्रकार समोर आले आहेत. तसं होऊ नये याची काळजी … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर

Uddhav Thackarey

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं आहे. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता … Read more

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण: वाट कसली बघतायेत, संजय राठोडांच्या मुसक्या आवळा; चित्रा वाघ यांची आक्रमक मागणी

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय. “पूजा चव्हाणची … Read more

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आल्याने शिवसेना अडचणीत आलीय. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर थेट कॅमेऱ्यासमोर न बोलता ऑफ दी रेकॉर्ड प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीच या प्रकरणी बोलतील असं राऊत यांनी म्हटलं असल्याचे वृत्त टीव्ही ९ वृत्तवाहिनीने दिलंय. शिवसेना नेते संजय राऊत … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुखांचे नाव द्यावे – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई 

सातारा प्रतिनिधी | सह्याद्री व्याघ्र संवर्धन प्रकल्पाची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेण्यात आली. संवर्धनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि सचिव यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही या बैठकीला उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे अशी मागणी केली आहे. यावेळी देसाई यांनी प्रकल्प आणि पर्यटन विकासाच्या संदर्भात त्यांनी काही … Read more