15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी

shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. 15 दिवसांमध्ये सरकार कोसळणार, फक्त सही बाकी आहे असं मोठं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आज उद्धव ठाकरे यांची जळगावात जाहीर सभा असून त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हे विधान … Read more

अजितदादांमध्ये CM होण्याची क्षमता, काहीजण लायकी नसताना मुख्यमंत्री झाले

raut ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मला 100 टक्के मुख्यमंत्री होण्यास आवडेल, आता म्हटलं तरी मुख्यमंत्रीपदावर दावेदारी ठेवण्याची तयारी आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये केलं होत. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारलं असताना अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यास सक्षम आहेत असं उत्तर त्यांनी … Read more

शरद पवारांच्या म्हणण्याप्रमाणेच राऊत अजितदादांना मविआतून बाहेर करणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संजय राऊत आणि अजित पवार यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. शरद पवार यांचा दाखला देऊन राऊतांनी रोखठोकमध्ये लेख लिहिला आणि तेथूनच या वादाला सुरुवात झाली. या लेखामुळे अजित पवार हे भाजपात जातील अशा चर्चांना उधाण आलं आणि राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. परंतु आपण जिवात जीव आहे तोपर्यंत … Read more

राज ठाकरे भाजपचे पोपट; राऊतांनी उडवली खिल्ली

raut raj thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र भूषण सोहळ्यात अनेक श्रीसेवक मृत्युमुखी पडल्याने राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावं अशी मागणी विरोधकांनी केल्यांनतर मग कोरोना काळातील मृत्युवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा का? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारची बाजू घेतली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर चांगलंच … Read more

संजय राऊतांनी थेट पवारांना सुनावलं; ‘त्या’ मुद्द्यावरून ‘मविआ’त ठिणगी??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मतदानासाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीनच्या मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात मतभेद पहायला मिळाले. एकीकडे देशभरातील विरोधी पक्षाने ईव्हीएम मशीन विरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी मात्र आपला ईव्हीएम मशीनवर विश्वास असल्याचे म्हंटल होत, त्यांनतर संजय राऊत यांनी अजित पवारांना चांगलंच सुनावलं आहे … Read more

तोंडात राम, पण बगलेत खंजीर; सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर घणाघात

Uddhav Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय करणार? श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वतःची राजकीय भाकरी शेकण्याचा प्रयत्न सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे. यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात केला … Read more

बेईमानी करताना श्रीरामांची आठवण नाही झाली का? राऊतांनी शिंदेंना फटकारले

sanjay raut eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आपल्या सर्व आमदार आणि नेत्यांसह अयोध्येत पोहोचले असून आज ते प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. बेईमानी करताना श्रीरामांची आठवण नाही झाली का? असा सवाल करत संजय राऊतांनी शिंदेंवर टीका केली आहे. तसेच श्रीरामानेही … Read more

ED आणि CBI हीच तुमची खरं काडतूसं, म्हणूनच तुमची मस्ती आणि चरबी

raut fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूस गृहमंत्री असा केल्यांनतर राज्यातील राजकारण पेटलं आहे. मी फडतूस नव्हे तर काडतूसं आहे, झुकेगा नही तर घुसेगा असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना प्रतिआव्हान दिलं. त्यांनतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला केला आहे. ED आणि CBI हीच तुमची खरं काडतूसं, … Read more

मोदींनी चहा विकला की नाही याप्रमाणे त्यांची डिग्री सुद्धा रोमांचक रहस्यपट

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री सार्वजनिक करण्याची मागणी केली म्हणून अरविंद केजरीवाल यांना गुजरात कोर्टाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींनी चहा विकला की नाही याप्रमाणे त्यांची डिग्री सुद्धा रोमांचक रहस्यपट आहे. तुमची इयत्ता कंची?” असे विचारले की, हा … Read more

मोदी हेच अदानी आहेत, ‘ते’ 20 हजार कोटी कोणाचे? राऊतांचा रोखठोक सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासुन अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत हेत. अदानी यांच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कोणाचे असा सवाल त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. हाच धागा पकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदींवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यानी … Read more