२०१४ साली सुद्धा शिवसेनेकडून काँग्रेसला सत्तेचा प्रस्ताव आला होता- पृथ्वीराज चव्हाण

शिवसेनेने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तास्थापण्याचा प्रस्ताव दिला होता असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी; काँग्रेस काय भूमिका घेणार?

शिवसेना खासदार संजय राऊतांकडून सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी, शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध कऱणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं.

संजय राऊत यांनी ‘तसं’ बोलायला नको होतं – शरद पवार

टीम हॅलो महाराष्ट्र, नाशिक : शिवसेना नेते संजय राऊत यांनी इंदिरा गांधी विषयी केलेल्या विधानावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवार यांनी म्हंटले की, संजय राऊत यांनी केलेल्या विधानापासून दूर आहे. मला त्या वादात पडायच नाही. पण इंदिरा गांधी यांच्याविषयी त्यांनी तसं बोलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली … Read more

मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिल्यास आम्ही विरोध करू ; काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

नवी दिल्ली : सावरकरांनी इंग्रजांकडे मागितलेल्या माफीचा इतिहास नष्ट करता येणार नाही. अशा परिस्थितीत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सावरकरांना भारतरत्न दिला तर आम्ही निषेध करू, तसेच त्याचा विरोध करू, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले की, सावरकर हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व … Read more

कर्नाटकी दहशतवादाचा महाराष्ट्र भाजप निषेध करेल काय? संजय राऊत उद्या बेळगाव दौऱ्यावर

टीम हॅलो महाराष्ट्र : बेळगाव सीमा प्रश्नी लढताना हौताम्य पत्करलेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यापासून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांकडून रोखण्यात आले. तसेच कर्नाटक पोलिसांकडून राज्यमंत्री राजेंद्र येड्रावकर यांना धक्काबुकी करण्यात आली. या प्रकरणी संजय राऊत यांनी भाष्य करत भाजपवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र भाजपा या कर्नाटकी दहशतवादाचा निषेध करेल काय, असा प्रश्न संजय राऊत यांनी … Read more

संजय राऊत यांना पदावरून हाकला! संभाजी भिडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.

”मोदींना पेढेवाले म्हणणाऱ्यांबरोबर भाजपा असल्याचा आनंद”; शिवसेनेचा सामनातून भाजपला टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या अशी विचारणा करत वादाला आमंत्रण दिलं. संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर भाजपने मैदानात उडी घेत राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत यांचे वक्तव्य हा शिवरायांचा अपमान आहे असं म्हणत भाजपने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. शिवसेनेनं भाजपच्या टीकेला आज समानाच्या अग्रलेखातून प्रतिउत्तर दिलं. शिवसेनेनं उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही वर्षांपूर्वी साताऱ्यातील पेढेवाल्यांशी केलेल्या तुलनेवरुन अग्रलेखातून भाजपाला सुनावले आहे.

संजय राऊतला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय – नारायण राणे

टीम हॅलो महाराष्ट्र : संजय राऊत या माणसाला सत्तेचा माज चढलाय, त्याच मानसिक संतुलन बिघडलंय, अशी जोरदार टीका खासदार नारायण राणेंनी केली आहे. भावाला मंत्रिपद मिळालं नाही तेव्हापासून राऊत अशी वक्तव्य करत असल्याचे राणे यांनी सांगितले. छत्रपती आमचं दैवत आहे, आमच्या देवतांबद्दल, त्यांच्या घराण्याविषयी वेडंवाकडं बोलला तर जीभ जाग्यावर राहणार नाही, याद राखा असा इशाराही … Read more

भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

टीम हॅलो महाराष्ट्र : भारतरत्न इंदिराजी गांधी यांच्या संदर्भातील विधान संजय राऊतांनी मागे घेतले आहे. त्यामुळे वादावर पडदा पडला आहे, पण भविष्यात संजय राऊत यांनी विचारपूर्वक विधाने करावीत, अशा शब्दांत महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संजय राऊत यांना सुनावले. तसेच आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दलचा तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही हे सर्वांनीच लक्षात … Read more

इंदिरा गांधींविषयीच्या ‘त्या’ दाव्यावरून संजय राऊत यांचा युटर्न, मागितली माफी

मुंबई : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर केलेले वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मागे घेतले आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या विधानामुळे कुणाला दुखावले असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो. मी कॉंग्रेस नेत्यांना नेहमीच पाठिंबा देत आलो आहे. कॉंग्रेसच्या आक्षेपावर संजय राऊत म्हणाले, ‘मी नेहमी इंदिरा गांधी, पंडित नेहरू, राजीव गांधी आणि गांधी परिवाराबद्दल आदर दाखवला … Read more