“बदनामीची मोहीम उद्या तुमच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही”; संजय राऊत यांचा भाजपला इशारा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. “हे शेकडो, हजारो कोटी खर्च करून निवडणुका … Read more

“आता उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोपही उडणार” ; किरीट सोमय्यांचा थेट ईशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईडीच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई करण्यात आली. या कारवाईवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. श्रीधर पाटणकर आणि त्यांचे कारनामे यासंदर्भात मी गेल्या दीड वर्षांपासून ईडीला पाठपुरावा करत आहे. ईडीने एका व्यवहाराची माहिती दिली असून 30 … Read more

“थोबाड सुजवून घेण्याची ठाकरे सरकारला सवयच”; अतुल भातखळकरांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अनधिकृत बांधकाम असल्याचे सांगत मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस पाठवली होती. या प्रकरणी आज हाय कोर्टाने मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा दिला. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला असून मनपानं पाठवलेल्या नोटिशीवर … Read more

आत्ताची शिवसेना दाऊदची बी टीम; राणेंचा घणाघात

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल म्हंटल होत त्यांवर आज भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला कोणाची बी टीम म्हणण्यापेक्षा आत्ताची शिवसेनाच दाऊदची बी टीम झाली आहे अशी जळजळीत टीका नितेश राणे यांनी केली आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. कारण … Read more

फक्त म्हणायला ठाकरे सरकार, लाभ घेते पवार सरकार; शिवसेना खासदाराचा घरचा आहेर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असले तरी काही नेत्यांमध्ये अंतर्गत नाराजी कायम आहे. याचाच प्रत्यय दापोली येथे आला. हे तर फक्त म्हणायला ठाकरे सरकार आहे, पण लाभ घेते पवार सरकार अस म्हणत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली. आघाडीत अंतर्गत … Read more

इम्तियाज जलील शरद पवार- उद्धव ठाकरेंची भेट घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेनं एमआयएमसोबत युती करणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले आहे. मात्र तरीही इम्तियाज जलील आपले प्रयत्न सुरूच ठेवणार आहेत. त्याचाच भाग म्हणजे ते लवकरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार … Read more

जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? मुख्यमंत्र्यांनी भाजपला घेरले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्यानंतर भाजपने शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएम सोबत युती नाहीच अस स्पष्ट करत हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरले आहे. जम्मू काश्मीर मध्ये मेहबुबा मुफ्तीसोबतची युती विसरलात का?? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. भाजपचे … Read more

MIM ही भाजपची B टीम, युतीचा प्रश्नच नाही; मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव धुडकावला

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएम ही भाजपची बी टीम आहे त्यामुळे त्यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. आज शिवसेना खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून भाजपला घेरण्याचाही प्रयत्न केला. एमआयएम सोबत युती नाहीच. शिवसेनेचं हिंदुत्व महाराष्ट्रभर पोहोचवून … Read more

नवाब मलिकांनी शिवसेना भवनात बॉम्बस्फोट केला; भाजप आमदाराचा सनसनाटी आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुंबईत आणि शिवसेना भवना बाहेर बॉम्बस्फोट घडवून आणला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांनाच वाचवायला पुढे आलेत असा सनसनाटी आरोप भाजप आमदार श्वेता महाले यांनी केला आहे. श्वेता महाले यांच्या या आरोपानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट घडवून आणणाऱ्या नवाब मलिका … Read more

“उद्धव ठाकरे उद्या ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानलाही…”; नितेश राणेंची टीका

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांची भेट घेतली. त्यावेळी जलील यांनी आम्ही महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव देतोय, असे सांगितले. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “सध्या एका ‘एमआयएम’ या कट्टरतावादी पक्षाला तुम्ही हवे हवेसे वाटता, तर उद्या तुम्ही ‘आयसीस’ला ही आवडणार. आता ‘आयसीस’ बरोबर चर्चा करण्याचेच राहिले आहे. उद्या उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत बोलतील की आम्ही ‘आयसीस’ बरोबर चर्चा करायला अफगाणिस्तानला चाललोय, अशी टीका राणे यांनी केली.

नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘एमआयएम’ हा कट्टरतावादी पक्ष आहे. टोकाची भूमिका घेतो. ज्या पद्धतीने शिवसेना अजानची स्पर्धा घेते. टिपू सुलतानच्या नावाचा गवगवा करते. एकंदरीत हिंदुत्वाची चादर बाजूला टाकून शिवसेना स्वतःला सेक्युलर म्हणवून घेण्याचे काम करते आहे.

नितेश राणे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. “दाऊद बरोबर फिरणारे, अंडरवर्ल्ड-अतिरेकी यांच्याबरोबर सौदा करणारे हे लोक शिवसेनेला आणि संजय राऊतांना चालतात? मुळामध्ये संजय राऊत हे शिवसेनेचे नेते नाहीत, तर ते ‘राष्ट्रवादी’चे एजंट आहेत, अशी टीका राणे यांनी केली.