हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या कोरोना विषाणूसंदर्भातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमेरिका कोरोना बाधित रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. स्थिती इतकी गंभीर असतानाही तरूप यांनी कोरोना आपोआप गायब होईल असे म्हण्टल्याने ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत.
सध्या अमेरिकेतील रुग्णसंख्या २८ लाख झाली आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी कोरोना आपोआप गायब होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. “मला आशा आहे की करोना आपोआप नाहीसा होईल. करोनाचा प्रादुर्भाव वाढतोय याची कल्पना आहे तरीही मला आशा आहे की करोना गायब होईल. एवढंच नाही तर लवकरच करोनावर आम्ही लस शोधून काढू. सध्या आम्ही करोना काळ असूनही काही महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहोत. त्यामुळे लवकरच अमेरिका सुस्थितीत असेल” असे ते यावेळी म्हणाले आहेत.
ट्रम्प नेहमीच आपल्या अशा विधानांनी चर्चेत येत असतात. महासत्ता अमेरिकेतच कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत असल्याने जगभरात याची चर्चा होते आहे. जगात सर्वाधिक रुग्ण तसेच सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. व सातत्याने मोठ्या संख्येत रुग्ण सापडत आहेत. अमेरिकेसोबत ब्राझील, रुस, स्पेन भारत या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येते आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.