मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली होती. ही माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही यासंदर्भात एक व्हिडीओ बनविला होता. आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांचे दवे असल्याचे आज सांगितले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीमी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील असे सांगितले आहे.
विरोधी पक्षनेते सातत्याने महाविकास आघाडीचे सरकार कोरोना काळात उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याचा दावा करीत आहेत. तसेच केंद्र सरकारने निधी देऊनही सरकार उपाययोजना करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्र सरकारकडून आलेला निधी आणि त्याची वर्गवारी स्पष्टीकरणासह सांगितली होती. यावर विविध नेत्यांनी फडणवीसांचे दावे चुकीचे असल्याचे सांगितले होते. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्यक्ष रोख रक्कम आणि प्रत्यक्ष कर्ज यांची आकडेवारीसहित माहिती द्या तर चर्चा करू असे म्हंटले होते.
To answer the questions that I raised yesterday, the Maha Vikas Aghadi had to hold multiple meetings. If they had held so many meetings to fight against #COVID19, then the state would not have had to go through this phase: Devendra Fadnavis, Maharashtra Leader of Opposition pic.twitter.com/V0f5iNscFA
— ANI (@ANI) May 27, 2020
आज महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत सरकारला जाणीवपूर्वक निष्कामी भासविण्याचा प्रयत्न केला जात आहे असे म्हंटले होते. तसेच पत्रकारांना याबद्दल माहिती घेण्यास सांगितले होते. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर फडणवीस यांनी मला उत्तरे देण्यासाठी इतक्या बैठका घेतल्या त्याच कोरोनाशी लढण्यासाठी घेतल्या असत्या तर राज्याला या टप्प्यातून जावे लागले नसते. असा टोलाही त्यांनी मारला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.