कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी आला. त्यामध्ये आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे पंचायत समितीचे प्रशासन अलर्ट झाले असून अनेक ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना पंचायत समितीत येऊ नका, असे सांगण्यात आले आहे आहे. जे मोजके अधिकारी आणि कर्मचारी कामावर यजत आहेत. त्यांचे प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. नागरिकांच्या कामाचे अर्ज स्वीकारण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर टेबल आणि रजिस्टर देण्यात आले आहे. तीन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीतील कर्मचारी अस्वस्थ आहेत.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकुण संख्या 1 हजार 695 वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत जिल्ह्यात 65 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल रात्री सर्वाधिक 94 नवे कोरोनाग्रस्त सापडले होते.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.