हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपासून कोरोना मुळे सर्व जगभर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक देश कोरोनावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात भारत सुद्धा सामील आहे. आत्तापर्यंत जगभरात २ ते ३ लसीच्या चाचण्या झाल्या आहेत . भारतीय पाच कंपन्या सुद्धा त्या लसीसाठी प्रयत्न करत आहे. युरोपीय देशांनी अमेरिका , ब्रिटन , युरोप या देशांनी आणि भारताने सुद्धा ज्या कंपन्या लस तयार करत आहेत त्याच्याशी करार केला आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत ५ कंपन्यांना कोरोना चाचणी साठी रोड मॅप तयार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य केंद्राकडून माहिती देण्यात आली आहे कि, कोणीही कोरोनाच्या लसीची वाट पाहू नका. आपण आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करा. कारण अनेक देशांमधून कोरोनाच्या लसीची मागणी वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर सगळ्या देशातील लोकांना लस मिळणे मुश्किल आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या. कोणावर अवलंबून राहू नका . कोणत्याही परिस्थितीत आपण कोविड १९ या आजाराशी दोन हात करायला हवेत. असे मत पश्चिमी देशातील रिजनल डायरेक्टर ताकेशी कासाई यांनी व्यक्त केले आहे.
सीएनएन ने दिलेल्या वृत्तानुसार , WHO चे रिजनल डायरेक्टर ताकेशी कासाई यांनी म्हंटले आहे कि, जरी कोरोनाची लस मिळाली तरी जोपर्यंत सगळ्या देशातील कोरोना हा पूर्णतः संपत नाही तोपर्यंत कोणताही देश हा सुरक्षित असणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्यामुळे कोरोना पसरणार नाही याची जास्त काळजी घ्यावी. ते पुढे असेही म्हणाले कि, कोरोना हा २० , ३० आणि ४० वयोगटातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसरला गेला आहे. तसेच जे अगोदर पासून आजारी आहेत. त्यांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका आहे. अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसू लागतात परंतु बऱ्याच लोकांना कोरोनाची लक्षणे दिसली नाहीत. असेही ते म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.