भारतात दररोज आढळतील २ लाख ८७ हजार रुग्ण, एमआयटी चा इशारा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. एप्रिल आणि मेच्या तुलनेत जून जुलै महिन्यात जगभरात संक्रमणाचा वेग वाढलेला असताना भारतात जर कोरोनाची लस लवकर सापडली नाही तर भारतात या आजाराची साथ भीषण रूप धारण करेल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीकडून (एमआयटी) करण्यात आलेल्या अभ्यासात हा अंदाज दर्शवण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, फेब्रुवारी २०२१ अखेरपर्यंत भारतात दिवसाला २ लाख ८७ हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होईल असे सांगण्यात आले आहे. ८४ देशांमधील टेस्टिंग आणि केस डेटाच्या आधारे हा अभ्यास कऱण्यात आला. यामध्ये जगभरातील एकूण ६० टक्के लोकसंख्येचा समावेश करण्यात आला होता.

एमआयटीचे संशोधक हाजहीर रहमानदाद, टी वाय लिम आणि जॉन स्टेरमन यांनी हा अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी साथीचा रोग विशेषज्ञांकडून वापरण्यात येणाऱ्या SEIR (Susceptible, Exposed, Infectious, Recovered) या मॉडेलचा वापर केला. या अभ्यासानुसार उपचार उपलब्ध न झाल्यास २०२१ मधील मार्च-मे महिन्यात जगभरातील करोनाबाधितांची संख्या २० ते ६० कोटी दरम्यान जाईल. यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे भारतात असेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. भारतानंतर अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि इऱाण या देशातील रुग्णसंख्या सर्वाधिक असेल असे सांगण्यात आले आहे.  अमेरिकेत दिवसाला ९५ हजार, दक्षिण आफ्रिकेत २१ हजार आणि इराणमध्ये १७ हजार रुग्णांची नोंद होईल असा अंदाज आहे वर्तविण्यात आला आहे.

भारतातील चाचणीचे प्रमाण त्याला मिळणारा प्रतिसाद, १ जुलै पासून चाचणीमध्ये दिवसाला करण्यात आलेली ०.१% वाढ आणि चाचणी चालू ठेवून संपर्क दर ८ वर (एका व्यक्तीमुळे आठ लोकांना संसर्ग होणे) नेला आहे या तीन गोष्टींच्या आधारावर हा अंदाज बांधण्यात आला आहे. या अभ्यासात कोरोना रोखण्यासाठी चाचणीचा वेग मोठ्या प्रमाणात वाढविणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे. उशिरा आणि कमी वेगाने चाचणी करणे धोकादायक ठरू शकते असे त्यांनी सांगितले आहे. महत्त्वाचं म्हणजे एमआयटीने जगभरातील करोनाबाधितांसंबंधीची आकडेवारी योग्यपणे दिली नसल्याचे सांगितले आहे.  “जगभरात एकूण ८ कोटी ८५ लाख लोकांना करोनाची लागण झाली असून १८ जून २०२० पर्यंत एकूण सहा लाख मृत्यू झाल्याचा आमचा अंदाज आहे,” असा दावा करण्यात आला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीनुसार, १८ जूनपर्यंत जगभरातील करोनाबाधितांची संख्या ८ कोटी २४ लाख असून ४ लाख ५४ हजार ६१० जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment