चारधाम यात्रेसाठी १ जुलैपासून ई पास सुरु, मात्र ‘या’ नियमांचे पालन करावे लागणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचे नियम हळूहळू शिथिल होत आहेत. आता उत्तराखंड सरकारने १ जुलैपासून चारधाम यात्रेसाठी ई पास देण्याची सुविधा सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. उत्तराखंड राज्य चारधाम देवस्थानं बोर्डाने एक मार्गदर्शिका जारी केली आहे. ज्यामध्ये यात्रेसाठीचे नियम जाहीर करण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा नियम हा केवळ राज्यातील नागरिकांनाच या यात्रेसाठी पास ची मागणी करता येईल हा आहे.

केवळ मंदिरात दर्शनासाठी ई पास देण्यात येईल. ज्या यत्रेकरूंना कोरोनाशी संबंधित काही त्रास जसे की श्वास घेण्यास त्रास, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर त्यांनी ई पास साठी अर्ज करता कामा नये. केवळ उत्तराखंड राज्यातील नागरिकच अर्ज करू शकतील. पास केवळ २०न दिवसांसाठी ग्राह्य धरला जाईल. एकदा मंदिरात दर्शन झाले की पास निरुपयोगी होईल. यात्रेकरूंनी  https://badrinath.kedarnath.gov.in या वेबसाईटवर अर्ज करून तिथून मंदिर दर्शनाचा पास प्राप्त करावयाचा आहे. या यात्रेसाठी ट्रॅव्हल एजन्सी, स्थानिक व्यक्ती अथवा प्रायोजक देखील तितकेच जबाबदार असतील. संबंधित पास हा केवळ देवस्थानाच्या भेटीसाठी असेल इतर कोणत्याही ठिकाणी भेट देता येणार नाही असे नियम समितीने बनविले आहेत.

 

भेटीच्या वेळी सरकारने जारी केलेल्या covid-१९ च्या मार्गदर्शक सूचनेनुसार मास्क लावणे व इतर सूचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. जर यात्रेत भेटीच्या वेळी जर काही लक्षणे जसे की खोकला, ताप, श्वास घेण्यास समस्या जाणवल्यास देवस्थान यंत्रणेतील संबंधित व्याव्क्तीशी संपर्क साधावयाचा आहे. मंदिरात प्रवेश करण्याआधी यात्रेकरूंची आपले हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक आहे. मंदिरात कोणत्याही वस्तूला हात लावणे टाळावे. अशी नियमावली जारी झाली आहे. त्यामुळे आता उत्तराखंड राज्यातील नागरिकांना चारधाम यात्रेला जाता येणार असले तरी इतर राज्यातील नागरिकांना आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment