कराड तालुक्यातील किरपे गावात तब्बल आठ महिन्यांनी कोरोनाचा शिरकाव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड कोरोना चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. अशात कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाने आठ महिन्यापूर्वीच प्रवेश केला होता. मात्र, तालुक्यातील किरपे या गावातील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी कोरोनाला वेशिवरच थांबवले होते. अखेर कोरोनाने किरपे गावात प्रवेश केलाच. मंगळवारी आलेल्या अहवालात किरपेतील एका व्यक्तीला कोरोनाचा लागण झाल्याचे निश्चित झाले आहे.
एप्रिलच्या सुरूवातीला एका कोरोना रूग्णामुळे धास्तावलेल्या कºहाड तालुक्याचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाच्या साखळीत अनेक गावे अडकली आहेत.  ही कोरोनाची साखळीचे तोडण्यासाठी प्रशासना कडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढली संख्या काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते.

आज दहा ते वीस रूग्ण सापडले तर लगेच दुसºया, तिसºया दिवशी एकदम पाचशे ते सहाशे रूग्ण सापडत आहेत. सद्या रुग्ण वाढीची संख्या हा तालुका वासियासाठी पुन्हा चिंतेचा विषय बनला आहे. सातारा जिल्हय़ाचा कोरोना बाधितांचा दिवसेंदिवस वाढत चालला असून बाधितांचे आकडे रोज नवा उच्चांक गाठत आहेत. सातासमुद्रपार असलेला कोरोना आपल्या शहरात येईल, अन् सर्वकाही ठप्प करेल, असा विचारही कºहाडकरांनी कधी केला नसेल. मात्र, बघता बघता या कोरोनानं कºहाड तालुक्यात चांगलाच कहर केला.

कोरोना संसर्ग महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेक सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करण्याची परंपरा खंडित झाली आहे. या वर्षीच्या गणपती उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेत कऱ्हाड तालुक्यातील किरपे गावातील ग्रामस्थांनी मास्क वाटप करून गणपती बाप्पांचे स्वागत केले. कोरोना काळात ग्रामस्थांनी ही ग्रामपंचायत प्रशासनास योग्य प्रकारे सहकार्य केल्याने आतापर्यंत आठ महिन्यात गावात एकही रुग्ण अडळलेला न्हवता. मात्र, नुकताच एक रुग्ण आढळल्याने गावातील लोकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. गावात औषध, धूर फवारणी करून लोकांच्या आरोग्याची काळजी ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.

दुचाकीवरून धूर फवारणी…
किरपे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव अजून वाढू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून बुधवारी रात्री दुचावरून गावातील सर्व रस्ते, अंतर्गत भागात धूर फवारणीची करण्यात आली. तसेच ध्वनिक्षेपकाद्वारे गावातील ग्रामस्थांना मास्क वापरा, घराबाहेर पडू नये, सँनिटायझर वापरा आदी विषयी सूचनाही देण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया
किरपे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपंचायतीकडून काळजी घेतली जात आहे. गावात ग्रामस्थांना नियमित मास्क वापरण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत. तसेच सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे असेही सांगण्यात आले आहे. नियम मोडल्यास दंडही करण्याचा इशारा दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com