हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी परदेशातून पीपीई किट मागवत आहे आणि कोरोना वॉरियर्सना ते उपलब्ध करुन देऊन त्यांना या लढाईसाठी फ्रंटलाइनवर लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, तर दुसरीकडे काही लोक आता चोरी तसेच दरोड्यासाठी पीपीई किट वापरत आहेत.
अशीच एक घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घडली आहे. येथे चोरट्यांनी पीपीई किट परिधान केले आणि सराफाच्या दुकानातून सोन्याची चोरी केली. स्थानिक पोलिसांना अशी माहिती मिळाली की, पीपीई किट घालून या चोरट्यांनी दुकानातून सुमारे 780 ग्रॅम सोने चोरून नेले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे प्रकरण उघडकीस आले. पीपीई किट घातलेल्या चोरट्यांनी या दुकानात बनवलेल्या वेगवेगळ्या शोकेस मधून सोन्याचे दागिने चोरले असल्याचे स्पष्ट झाले.
सीसीटीव्ही फुटेजमधून हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे
कोविड -१९ मुळे सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान झालेल्या २ दिवस आधीच्या या घटनेच्या फुटेजमध्ये चोरटे टोपी, मास्क, प्लास्टिकचे जॅकेट्स आणि हँड ग्लोव्हज घालून शो केसमधून दागिने चोरताना दिसले.
या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दुकानदाराने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की,’ चोरांनी 78 तोळे म्हणजे 780 ग्रॅम सोन्याची चोरी केली आहे.’ दुकानदाराने पुढे सांगितले की,’ चोरट्यांनी दुकानाची भिंत तोडून आत प्रवेश केला.’
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.