कोरोना विषाणूचे जागतिक स्तरावरील नवीन रेकॉर्ड 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूचे काही नवीन रेकॉर्ड समोर आले आहेत. यातील पहिले रेकॉर्ड म्हणजे जगभरात या विषाणूला बळी पडून मरणाऱ्यांची संख्या ५ लाख पार करून केली आहे तर दुसरे रेकॉर्ड म्हणजे जगभरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता १ कोटी पार करून गेली आहे. त्याचबरोबर एकाच दिवसात सर्वाधिक रुग्ण सापडण्याचे देखील रेकॉर्ड झाले आहे. अमेरिकेत मी महिन्याच्या सुरुवातीला सर्व आर्थिक व्यवहार सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र वाढती रुग्णसंख्या बघून आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांनी सुरु केलेले बार तसेच रेस्टारंट बंद करण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर कॅलिफोर्निया, फ्लोरिडा येथील गव्हर्नर नी देखील सर्व काही सुरु करण्याच्या निर्णयांना स्थगिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री ज्वेलिनी मखाईज यांनी येत्या काही आठवड्यात देशात वेगाने संक्रमण पसरण्याची शंका व्यक्त केली आहे. युरोपमध्ये देखील संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचे इंग्लंड च्या लाइसेस्टर आणि स्विस नाईट क्लब मध्ये पसरणाऱ्या संक्रमणावरून समोर येते आहे. तर पोलंड आणि फ्रांस मध्ये मात्र सर्व काही सामान्य स्थितीला येत आहे. इथे मास्क तसेच सामाजिक अलगाव पाळला जात असल्याने त्यांच्या लांबलेल्या निवडणुकाही घेतल्या जात आहेत. जॉन्स हॉपकिन्स विश्वविद्यालयाच्या अनुसंधानकर्त्यानी सांगितले ५ लाखापेक्षा अधिक मृतसंख्या असली तरी तज्ज्ञांच्या मते मृतांची संख्या आणखी उल्लेखनीय असणार आहे

संपूर्ण जगातील रुग्णसंख्येच्या एक चतुर्थांश रुग्णसंख्या अमेरिकेत आहे. एका दिवसात १,८९,००० इतकी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आली असून हे ही रेकॉर्ड असल्याची माहिती समोर आली आहे. तर अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात १५ मार्च नंतर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या मृतांच्या संख्येत आज दिलासादायक माहिती समोर आली आहे. आज केवळ ५ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. ही संख्या आतापर्यंतच्या मृतांच्या संख्येत सर्वाधिक कमी आहे. तरीही अमेरिकेतील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या शहरात न्यूयॉर्क वरच्या क्रमांकाला असून आतापर्यंत इथे २५,००० लोकांचा कोरोनाने ममृत्यू झाला आहे. तर एप्रिल मध्ये जिथे १८,००० रुग्ण रोज रुग्णालयात भरती करावे लागत होते तिथे शनिवारी ९००पेक्षाही कमी रुग्ण रुग्णालयात भरती केले गेले. जागतिक पातळीवर कोरोनमुक्तीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.