मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्धव ठाकरेंकडून जोरदार हालचाली

तब्बल एक महिन्याच्या सत्ता नाट्यानंतर अखेर राज्यामध्ये सरकार स्थापन झाले. केवळ ४ दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री प[पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीने राज्यात सरकार स्थापन केले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांनी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात ठाकरे सरकारच असणार हे निश्चित झाले.

बुलेट ट्रेन बासनात गुंडाळायची हीच ती वेळ! मनसे आमदाराने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तब्बल एक महिन्यांच्या सत्ता नाट्यानंतर शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आली आहे. शिवसेनेने आता भाजपच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय आणि मंजूर केलेल्या प्रकल्पाचे परीक्षण करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यात मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनसह राज्यातील अनेक प्रकल्पांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बुलेट ट्रेन संबंधी थेट आव्हान केलं आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांचा शिवसैनिक विराजमान, उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

शिवाजी पार्कवरील न भूतो न भविष्यती अशा गर्दीला संबोधत, छत्रपती शिवाजी महाराज आणि आई वडिलांना स्मरून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची गुरुवारी सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी शपथ घेतली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पत्ता – मातोश्री की वर्षा ??

महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काही वेळातच शपथ घेतील. तब्बल २० वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहण्याचं भाग्य महाराष्ट्रातील जनतेला लाभलं आहे. १९९६ साली युतीचं सरकार आल्यानंतर सत्तेचा रिमोट कंट्रोल आपल्याकडे ठेवत बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी आणि नारायण राणेंच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली. ठाकरे घराण्यातील कुणी सक्रिय राजकारणात सहभागी होईल अशी अर्थाअर्थी शक्यता वाटत नसताना २०१९ साली आदित्य ठाकरे यांनी वरळीतून विधानसभेची निवडणूक लढवली आणि ठाकरे घराण्यातील ते पहिले आमदार बनले.

शरद पवारांच्या पंतप्रधानपदाच्या तयारीची ‘हीच ती वेळ’

गुरुवारी संध्याकाळी शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना महाराष्ट्रातील या सत्ताबदलाचे मुख्य सूत्रधार असलेले शरद पवार लक्षात आले नाहीत तर नवलच..!! आपल्या ५० वर्षांपेक्षा अधिक काळाच्या राजकारणाचा अनुभव पणाला लावत शरद पवारांनी भाजपच्या लोकांना सत्तास्थापनेपासून दूर ठेवलं. हे करत असताना शिवसेनेच्या झोपलेल्या वाघाचा स्वाभिमानही त्यांनी जागृत करुन दिला. गेली ५ वर्षं आपल्या खिशात राजीनामा घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना इथून पुढे मात्र काही कालावधीसाठी का होईना सत्तेचा मनसोक्त आनंद उपभोगता येणार आहे. राजकारणात कुणीच कुणाचं कायमचं शत्रू नसतं हा विचार डोक्यात घेऊन महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकासआघाडीचं सरकार आता अस्तित्वात आलं. ‘मला माझ्या जुन्या मित्रांसोबत आता काम करता येईल’ हे छगन भुजबळ यांनी केलेलं सूचक विधान याबाबतीत खूप बोलकं आहे. शपथविधीसाठी देशभरातील विविध मान्यवरांना निमंत्रण दिली गेली होती. यामध्ये ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा प्रामुख्याने समावेश होता.

मी बंड केला असं तुम्ही कसं म्हणता? अजित पवार भडकले

मुंबई प्रतिनिधी | अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आज सकाळ पासून सुरु होती. पवार सकाळ पासून अनरिचेबल झाल्याने आता अजित पवार काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आपण आज शपथविधी घेणार नसल्याचे पवार यांनी स्वत: जाहिर केले आहे. यावेळी आपण उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही होता. मात्र तुम्ही बंडखोरी केल्यामुळेच तुम्हाला … Read more

ठरलं अजित पवारचं उपमुख्यमंत्री होणार!

गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्तास्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्यानं देवेंद्र फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले त्याचबरोबर भाजपने काही तास सत्ता काबीज केली होती. हे बघता उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह तयार झाले होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव यांच्यासमोर असणार ‘हे’ मोठं आव्हान

महिनाभरापासून सुरु असलेल्या राजकीय सत्ता नाट्यावर अखेर पडदा पडला. बहुमत सिद्ध करू न शकल्याकारणाने भाजपा सरकार कोसळले आणि महाविकासआघाडीला सत्ता स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर सर्वात मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे.

उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून ‘हे’ नाव निश्चित

मुंबई प्रतिनिधी | राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले असून मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरेंचे नावही निश्चित झाले आहे. बुधवारी रात्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडे तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचे निश्चित झाले आहे. उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीत जोरदार रस्सीखेच सुरु असून अजित पवार आणि जयंत … Read more

एकनाथ खडसे यांनी केला फडणवीस यांच्यावर शाब्दिक वार..

शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यान मुख्यमंत्री होणार असल्याचं निश्चित झालं आणि देवेंद्र फडणवीस यांना आपल्या औटघटकेच्या मुख्यमंत्रीपदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला. ज्या अजित पवार यांच्या पाठिंब्याने फडणवीस रातोरात मुख्यमंत्री बनले होते. त्या अजित पवार याना आपल्यामागे कोणी नाही याची जाणीव झाली आणि अखेर नामूशकीतून त्यांनी राजीनामा दिला. मात्र, त्यामुळं मी पुन्हा येईन असा आत्मविश्वास असणाऱ्या फडणवीस यांचा पुन्हा हिरमोड झाला. आधी विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं त्यांच्या नैतृत्वावर पक्षात दबक्या आवाजात टीका होती. परंतु, फडणवीस यांच्या वागणुकीतून दुखावलेले अनेकजण आता फडणवीस यांच्या नाचक्कीनंतर खुलेआम आता त्यांच्यावर शरसंधान साधत आहेत.