बाप लेकीच्या नात्याला काळिमा 

बाप लेकीच्या नात्याला जगात तोड नाही असे आपण म्हणतो परंतु काही नराधमांमुळे या पवित्र नात्याला काळिमा फसला जातोय. समाजातील विकृत मानसिकतेच्या वाढत्या पेवामुळे बलात्कार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना नालासोपारा येथे घडलीय. एका नराधम बापानेच आपल्या ७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून, या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार

मुंबई प्रतिनिधी | भांडूपमधून अपहरण करण्यात आलेल्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांनी विद्याविहार रेल्वे स्टेशन जवळील एका नाल्यातून ताब्यात घेतला असून आरोपीला भांडूप पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी यांनी दिनांक 5/11/19 रोजी पोलीस ठाणेस येऊन फिर्याद दिली … Read more

बलात्काराच्या आरोपाखाली प्रसिद्ध दिग्दर्शकाला अटक; गुन्हा केल्याची दिली कबुली

मागच्या वर्षीपासून सुरू झालेल्या ‘मी टू’ चळवळीनं अख्खं बॉलिवूड ढवळून निघालं. त्यानंतर आता साउथ मधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार सुदीप्तो चटर्जी यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाटकाच्या ग्रुपमधील एका विद्यार्थीनीवर अनेक महिने बलात्कारकेल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणामुळे सुदीप्तो यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आरोपीनं पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. तर दुसरीकडे सुदीप्तो यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे.

बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती, ३ महिन्यांनंतर प्रकार उघडकीस

 एका अज्ञात नराधमाने केलेल्या बलात्कारातून मतिमंद मुलगी गर्भवती झाल्याची घटना जामखेड तालुक्यात उघडकीस आली आहे. पीडितेच्या मतिमंदपणाचा फायदा घेत हा अज्ञात नराधम गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत होता. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक!! जामिनावर सुटून आलेल्या आरोपीने पुन्हा केला पीडितेवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर पूर्वी बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या नराधमाने जामिनावर सुटून आल्यावर केस का केली? असे म्हणत पुन्हा तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घडली. सागर सुनील श्रीसुंदर (रा शांतीपुरा,छावणी) असे आरोपीचे नाव आहे. या नराधमावर याआधी सदर पीडित अल्पवयीन मुलीचे रिक्षातून अपहरण करून बलात्कार केल्याचा छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

विट्यात मतीमंद महिलेवर बलात्कार प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

सांगली प्रतिनिधी| विटा येथील मतिमंद महिलेच्या असहाय्यतेचा फायदे उचलत तिच्यावर बलात्कार करणारा नराधम दत्तात्रय चव्हाण-नाईक याला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश उज्वला नंदेश्र्वर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा जानेवारी २०१५ साली घडला होता. यातील पीडिता तिच्या आई व भावासोबत भवानीमाळ विटा येथे राहत होती. ती मतिमंद असल्याने तिचे लग्न झाले नव्हते. यातील आरोपी पीडित महिलेच्या … Read more

भिवंडीत आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून, आरोपी अजूनही मोकाट

ठाणे प्रतिनिधी। भिवंडीत एका आदिवासी महिलेचा बलात्कार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र या महिलेचा बलात्कार करून आयुष्य संपवणारा नराधम मोकाटच फिरत. सदर बलात्कार आणि खून प्रकरणांत अजून आरोपीला अटक करण्यात आली नाही आहे. प्रीती भावर असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला कामावरून घरी जात असताना तिला एका अज्ञात नराधमाने पकडून … Read more

लग्नाचे आमिष लावून शरीर संबंध ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या अथवा ऐकल्या असतील मात्र या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला शरीर संबंध ठेवताना माहित असेल की या नात्याचे लग्नात रूपांतर होणार नाही आणि तरी देखील ती स्वेच्छेने शरीर संबंध ठेवत असेल तर मग तो बलात्कार होऊ शकत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने एका … Read more

शिक्षकानेच केला शाळकरी मुलींचा विनयभंग, मिलिटरी स्कूलमधील धक्कादायक प्रकार

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकानेच शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात शिक्षका विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील भोसला मिलिटरी स्कूलच्या गर्ल्स हॉस्टेल मधील चार ते पाच मुलींचा खेळाच्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई नसलेल्या एका … Read more

१२ वर्षा खालील मुलींवर केल्या जाणाऱ्या बलात्काराला फाशीच

Women Rape

नवी दिल्ली | १२ वर्षा खलील मुलींवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. यासाठी गुन्हेगारी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली आहे. ३० जुलै रोजी लोकसभेने गुन्हेगारी कायदा सुधार विधेयक २०१८ पास केले होते. तेच विधेयक काल राज्यसभेने सम्मत केल्याने आता या कायद्याची वाट मोकळी झाली आहे. कठुआ आणि उन्नाव प्रकरण झाल्यापासून सरकार वर चौफेर … Read more