मोदी सरकारने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची आशा सोडली- पी. चिदंबरम

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने टॅक्स स्लॅब सवलतीबरोबरच इतरही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी प्रदीर्घ भाषण केलं. अर्थसंकल्पानंतर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीए -२ सरकारमध्ये अर्थमंत्री असलेले पी. चिदंबरम यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Budget2020Live: मध्यमवर्गाला मोठा दिलासा, सरकारने टॅक्समध्ये केला बदल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मोदी सरकारने कर स्लॅबबाबत मोठी घोषणा केली आहे. करदात्यांना दिलासा देताना अर्थमंत्री म्हणाले की, आता 5 ते 7.5 लाख रुपये उत्पन्न मिळविण्याकरिता 10 टक्के कर भरावा लागेल. 7.5 ते 10 लाख रुपये मिळविण्याकरिता तुम्हाला 15 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळविण्यासाठी 20 टक्के कर भरावा लागेल. … Read more

अखेर एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं काढली विक्रीस

सरकारी हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया कंपनी मोदी सरकारनं विक्रीस काढली आहे. केंद्र सरकारची मालकी असलेली एअर इंडिया एप्रिलपूर्वीच खासगी कंपनी होणार आहे. एअर इंडियातील १०० टक्के मालकी हिस्सा विक्री करण्याच्या प्रक्रियेने दिल्लीत वेग घेतला असून सरकारने याविषयी सोमवारी माहिती उपलब्ध केली. सरकारनं कंपनीसाठी खरेदीदारांकडून प्रस्ताव मागवले असून, खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी १७ मार्च २०२० अखेरीची तारीख आहे. याचबरोबर सरकारनं ‘एअर इंडिया एक्सप्रेस’ आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन सरकारी अनुदानित कंपन्यासाठीही बोली मागवल्या आहेत.

तर मी मोदी साहेबांच्या सभेतही बोलायला घाबरत नाही- मंत्री गुलाबराव पाटील

”अन्याय जर सहन झाला नाही तर मी मोदी साहेबांच्या सभेतही बोलायला घाबरत नाही असा आपला स्वभाव आहे. अखेर काय होईल शेवटी घरी बसू आणि तसे ही माजी आमदाराची लाख रुपये पेन्शन आहे. आपल्या गरजा फार मोठ्या नाही आणि ज्याला पेन्शन आहे त्याला काय टेंशन आहे. त्यामुळे स्पष्ट वक्ता सुखी भव असं विधान पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील केलं आहे. ते भुसावळ येथे भूमिपूजन सोहळ्या दरम्यान बोलत होते. या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यासह विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

कराडचा ‘गलीबॉय’ नोमान खानच्या रॅपमधून मोदी सरकार धारेवर

मागील वर्षी आलेल्या गलीबॉय या चित्रपटाने अवघ्या भारतीय चित्रपटसृष्टीला खिळवून ठेवलं होतं. आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी धडपडणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांची गोष्ट गलीबॉयमध्ये समर्पकपणे दाखवण्यात आली होती. या चित्रपटानंतर देशभरात रॅप गाण्याची चलती दिसून येऊ लागली. वास्तव घडामोडींवर, देशातील बऱ्या-वाईट गोष्टींवर लक्ष केंद्रित करून रॅप गाणं रचले जाऊ लागले. असाच एक प्रयत्न सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील नोमान खान यांनी केला आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळात मित्रपक्षातील नेत्यांना मिळणार स्थान? मोठा फेरबदल होण्याची शक्यता

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये अधिकतर भाजपच्या मित्र पक्षातील नेत्यांना संधी मिळू शकते. मोदींनी ३० मे रोजी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपमधील नेत्यांना अधिक संधी दिली होती. यात जेडीयू सारख्या पक्षातील एकही नेत्याचा समावेश नव्हता. याशिवाय शिवसेने सारख्या दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला केवळ प्रतिकात्मक प्रतिनिधित्व मिळाले होते.

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”- प्रकाश आंबेडकर

“या निवडणूकीत मी जिंकलो, तर पूर्ण देशाचं राजकारण बदलेल”, असा विश्वास प्रकाश आंबेडकरांनी घनसांगवीत बोलतांना केला. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार विष्णू शेळके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची जालना जिल्ह्यातील घनसावंगी मध्ये सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

भाजप सरकार हे धनदांडग्याचं; वनजमीन हडपण्याचा सरकारचा डाव – सीताराम येचुरी

शहापूर विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कृष्णा भवर यांच्या प्रचारार्थ मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मा. खासदार सिताराम येचुरी यांची प्रमुख उपस्थिती होती