राज्यात अनेक वर्षे सत्ता, तरी यांना मराठा आरक्षण देता आलं नाही; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारवर घणाघात

परभणी । ”राज्यात अनेक वर्षे सत्ता असताना यांना मराठा आरक्षण देता आलं नाही,” अशी घणाघाती टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. विधानपरिषद पदवीधर निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होत्या. (Maratha reservation) राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होत आहेत. औरंगाबाद मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण निवडणुकीच्या … Read more

पंकजा मुंडेंसह ‘या’ नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता

नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (j.p. nadda) यांच्या नेतृत्वाखालील भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार आहे. त्यात राज्यातील ४ नेत्यांचा समावेश होणार असून या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे (pankaja munde), आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २० जानेवारी रोजी जे. पी. नड्डा … Read more

भाजपच्या राज्य कार्यकारणीत पंकजा मुंडेंचे नाव गायब, चंद्रकांत पाटील म्हणाले..

मुंबई । भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर केली. मात्र, राज्यातील कार्यकारणीत पंकजा मुंडेंना स्थान मिळालं नाही. यावर चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना केंद्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाईल तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. भाजपने आज जाहीर केलेल्या राज्य कार्यकारणीत पक्षामध्ये साईडलाईनला गेलेल्या नेत्यांचा समावेश … Read more

माझ्या आजारपणात बहीण पंकजा हिनं फोन केल्याचा आनंद वाटला- धनंजय मुंडे

मुंबई । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच कोरोनावर मात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर १० दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात असलेले मुंडे काही दिवसांपूर्वी घरी परतले असून सध्या क्वारंटाइन आहेत. क्वारंटाइन असतानाच त्यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधला आणि आजारपणाचे अनुभव सांगितले. त्यात धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांनी केलेल्या … Read more

भाजप जुलैमध्ये नवीन राज्य कार्यकारणी गठीत करणार; नाराज पंकजा-खडसेंना स्थान मिळणार का?

मुंबई । भाजपात जुलैमध्ये मोठे संघटनात्मक बदल होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणाऱ्या राज्य कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना स्थान देण्याबाबत विचार सुरु आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर या सर्व फेरबदलामध्ये आता पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे यांना पक्ष कोणती जबाबदारी देतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची … Read more

मनावर दगड ठेवून मी ‘हा’ निर्णय घेत आहे- पंकजा मुंडे

मुंबई । भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ३ जूनचा परळी दौरा रद्द केला आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार होत्या. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर जाण्याऐवजी घरात राहूनच आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करणार आहेत. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांना ही माहिती दिली … Read more

‘तो’ दिवस उजाडायलाचं नव्हता पाहिजे; वडिलांच्या आठवणीत पंकजा मुडेंची भावुक पोस्ट

मुंबई । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या ३ जून रोजी होणाऱ्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाबद्दल पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी संघर्ष दिन म्हणून साजरा केली जाते. यानिमित्ताने गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने मुंडे समर्थक जमतात. पण सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे … Read more

उद्याचं निर्णय जाहीर करा बस्स!! ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई । लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील विविध भागात अडकलेल्या ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची सोय झाली पाहिजे अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला पुन्हा एकदा केली आहे. उद्याच्या उद्या याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात यावा असंही त्या म्हणाल्या आहेत. इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर … Read more

प्रितमताईंना शोधा १ हजार रुपये मिळवा, खासदार प्रितम मुंडेंना बीडच्या तरुणाचे खूलेपत्र

बीड प्रतिनिधी । भाजप खासदार प्रीतम मुंडे मतदार संघातील समस्यांकडे लक्ष देत नाहीत अशी तक्रार करत एका तरुणाने मुंडे यांना खुले पत्र लिहिले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावित खासदार प्रीतम मुंडे मतदार संघात नसल्याने निदान आता तरी प्रीतमताईंनी बीडला यावे असे आवाहन सदर युवकाने केले आहे. अक्षय मुंडे नावाच्या युवकाने फेसबुकवर हे पत्र पोस्ट केले … Read more

राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेतही; पंकजा मुंडेंनी पराभव स्वीकारला

बीड | जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज होत आहे. यापूर्वीच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून या निवडणुकीवर भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हंटले की, राज्यातील आघाडीचा परिणाम जिल्हा परिषदेत ही आहे. रात्रीच बीड जिल्ह्यातील शिवसेनेने त्यांची इच्छा असतानाही बरोबर येण्याबद्दल असमर्थता दर्शवली. लोकशाहीची प्रक्रीया म्हणून निवडणूक लढवत आहे बाकी निकाल स्पष्टच आहेत. … Read more