पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं; खासदार काकडेंची पंकजा मुंडेंवर घणाघाती टीका

काल गोपीनाथगडावर पंकजांनी केलेलं भाषण हे भाजपाच्या सच्चा कार्यकर्त्यास दुखवणारं असल्याच सांगत, ज्याला आपला मतदारसंघ सांभाळता येत नाही, ते महाराष्ट्रात काय फिरणार व काय दिवे लावणार? असं म्हणत खासदार काकडेंनी पंकजा यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.

गोपीनाथरावांचं स्मारक राहूदे, मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा;पंकजा मुंडेंचं उद्धव ठाकरेंना आवाहन

भाजप हा माझ्या बापाचा पक्ष असल्याचं सांगत पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातल्या राजकीय धुमश्चक्रीला जिवंतपणा आणून देण्याचं काम गोपीनाथगडावर आज केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्यासह एकनाथ खडसे, महादेव जानकर यांनी आपली खदखद बाहेर काढली.

आप्पा… गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिवशी धनंजय मुंडेंचे भावनिक ट्विट

बीड | भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त बीडमधील गोपीनाथगडावर मुंडे समर्थकांचा मोठा मेळावा होणार आहे. गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी यानिमित्त ‘स्वाभिमान दिना’चं आयोजन केलं आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही ट्वीट करुन आपले आप्पा अर्थात गोपीनाथ काकांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘आप्पा, तुमचाच वारसा … Read more

पक्षाच्या विभागीय बैठकीला पंकजा मुंडे अनुपस्थित, भाजपसोबत बिनसल्याच्या चर्चेला उधाण

भाजपच्या बैठकीचे निमंत्रण असुन देखील पंकजा मुंडे आज औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या विभागीय बैठकीला अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले होत. गेल्या काही दिवसापासून पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं भाजपशी बिनसल्याची चिन्हे त्यांच्या वागण्यातून दिसत आहे.

एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमधील नाराज येत आहेत एकत्र

भाजपानं ऐन विधानसभा निवडणुकांच्या काळात निष्ठावंतांना तिकीट नकारत डावललं होतं. यात एकनाथ खडसे हे नाव सर्वात पुढं होत. निवडणुकी दरम्यान आणि नंतरही खडसे याबाबतची आपली खंत वारंवार माध्यमांमध्ये बोलून दाखवत आहेत. या नाराजी प्रकरणात आता एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीतून सुरु झालेल्या चर्चांच्या मागचं कारण म्हणजे पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी गोपीनाथ गडावरील मेळाव्यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती.

पंकजा मुंडें बद्दलच्या ‘त्या’ सर्व अफवा – चंद्रकांत पाटील

भाजपा च्या मोठ्या नेत्या आणि माजी महीला बाल कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मागील काही दिवसांपासून भाजपा सोडण्याच्या चर्चांना उधाण आले होते. पंकजा मुंडे या त्यांच्या हक्काच्या परळी मतदार संघातून विधानसभेसाठी उभ्या होत्या. मात्र त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या कडून त्यांना पराभव पत्करावा लागला. हा पराभव पंकजा मुंडेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर कार्यकर्त्यांना उद्देशून एक पोस्ट लिहीली, ज्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नवीन विचार करण्याची आवश्यकता असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं होतं.

पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? राज्यात राजकीय भुकंपाची शक्यता

विशेष प्रतिनिधी | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चारली होती. त्यानंतर पंकजा यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या मिटींगला हजेरी लावणे सुरु केले होते. मात्र पंकजा यांच्या पराभवात त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांचा … Read more

परळीत घुमला ‘मोदी’ नाद, थकलेल्या नेत्यांना आता घरी बसवा – नरेंद्र मोदी

भाजपच्या नेत्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला काँग्रेस राष्ट्रवादीने नावं ठेवलीत. आज त्यांना कुणीच विचारत नाही कारण कृती करण्याचं धाडस ते दाखवू शकत नाहीत असं मोदी पुढे म्हणाले.

पंकजा मुंडेंच्या सभेतील गोंधळाचं भाजप कनेक्शन?

पिंपरी चिंचवड प्रतिनिधि | भाजप उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे रविवारी पुणे दौर्‍यावर होत्या. यावेळी पिंपरी चिंचवड येथील प्रचार सभेत गोंधळ झाला. पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना नागरीकांमधून काही जणांनी घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड परिसरात मराठवाड्यातून मोठा वर्ग आला अाहे. त्यांनी भाजपलाच मतं द्यावीत यासाठी जगताप यांनी … Read more

इतिहासाची पुनरावृत्ती: वाजपेयींनी सभा घेतलेल्या मैदानातच मोदींची सभा

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. या पार्श्वभूमीवर १७ तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येत आहेत. या निमित्तान परळीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कारण, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे.