तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे..!!

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा कधी सुटणार असा प्रश्न संपूर्ण राज्याला सध्या पडला आहे. विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राच्या जनतेने युतीच्या पारड्यात आपला कौल दिला होता. मात्र शिवसेनेने युती ही पद आणि जबाबदाऱ्यांच्या समसमान वाट्यावरच झाली होती असे सांगत मुख्यमंत्रीपदावर आपला दावा केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदाबाबत काही चर्चाच झाली नसल्याचा खुलासा करत भाजपने सेनेचा दावा खोडून काढला.

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरेंवर केलेली टीका भोवली !’आचारसंहिता भंगा’चा गुन्हा दाखल

कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची नोंद घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह विधान भोवण्याची चिन्ह आता दिसत आहेत. कन्नड तालुक्यातील पिशोर पोलीस ठाण्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मी स्वयंपाक करेन, पण अजित पवारांचे पाणी आपल्याला चालेल का? – उद्धव ठाकरे

”जेवणाच्या ताटात पवार खडे का टाकतात ? गरिबांसाठी १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिले यात काय वाईट? याच गरिबांसाठी स्वयंपाक करण्याची वेळ माझ्यावर आली तरी करेन. मी स्वयंपाक करेन, पण अजित पवार पाणी देतील ते पाणी आपल्याला चालेल का? असा सवाल उपस्थितांना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांनी यावेळी शरद पवारांवर सुद्धा हल्लाबोल केला. कोल्हापूर उत्तर शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक,  अरुण दुधवडकर यांच्यासह भाजप आणि सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुण्यात दसऱ्यानंतर धडाडणार ‘ठाकरी’ तोफा; उद्धव, राज यांच्या एकाच दिवशी सभा

राज ठाकरे यांची ९ ऑक्टोबरला पुण्यात टिळक चौकात (अलका चौक) तर त्याच वेळी उद्धव ठाकरे यांची पिंपरीत संध्याकाळी ७ वाजता सभा होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं असताना हे दोन ठाकरे बंधू आपल्या सभांमधून कुणाला लक्ष्य करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी। ‘दोन्ही पक्षात काही ठिकाणी बंडखोरी झाली असली तरी येत्या दोन दिवसांत सर्व बंडखोरांना माघार घ्यायला लावू. जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांना युतीत कोणतंही स्थान राहणार नाही. त्यांना त्याची जागा दाखवून दिली जाईल’, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद … Read more

आदित्य ठाकरेंच्या बँकेमध्ये १० कोटी रुपयांच्या ठेवी, प्रतिज्ञापत्रातून समोर आली संपत्तीची आकडेवारी

मुंबई प्रतिनिधी। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरूवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आई रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाबरोबर आदित्य यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे. यामध्ये बँक … Read more

‘माझी हक्काची जागा मला मिळाली, हे कोणाचे उपकार नाहीत’- विजय शिवतारे

पुणे प्रतिनिधी। ‘महायुतीच्या जागा वाटपामध्ये काही सूत्र ठरले होते. त्यानुसार, माझी हक्काची जागा मला मिळाली. महायुतीमधील पक्षाच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, हे निश्चित होते. त्यामुळे आज जागा वाटप झाल्यानंतर पुरंदरचा विद्यमान आमदार असल्याने ही माझी हक्काची जागा मला मिळाली. ती देऊन कोणी माझ्यावर उपकार केलेले नाहीत’, असा टोला शिवसेनेचे मंत्री आमदार विजय शिवतारे … Read more