लाॅकडाउन इफेक्ट : व्हिडिओ काॅलवरच केले ‘या’ जोडप्याने लग्न

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे, अशा परिस्थितीत लोकांच्या विवाहांवरही परिणाम होत आहे. पण महाराष्ट्रात अशी एक घटना समोर आली आहे. जिथे काझीने वधू-वरांचे फक्त व्हिडिओ कॉलच्या मार्फत लग्न लावले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ही बातमी औरंगाबादची आहे. फोनवर काझी जोडप्याचे लग्न लावत आहे. एकीकडे काझी … Read more

धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न

औरंगाबादमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा शाही विवाह सोहळा कोरोनासंदर्भात शासनाने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करुन केला जात आहे.

औरंगाबादेत कोरोना रुग्णाचा मृत्यू? व्हाॅट्सअॅपवर डॉक्टरनेंच पसरवली अफवा!

औरंगाबाद प्रतिनिधी | शहरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाला होता. आता हा मेसेज ही अफवा असल्याचे समोर आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांनी सांगितले आहे. चिकलठाणा परिसरातील धूत रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा मेसेज व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाला होता. याबाबत आता दोन डाॅक्टरांवर … Read more

दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात औरंगाबादमध्ये एकाही रुग्णाची वाढ नाही

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनाच्या दुसर्‍या टप्प्यात शहरात एकही कोरोना रुग्ण सापडलेला नाही. यामुळे कोरोनाला आळा घालण्यात औरंगाबाद जिल्हा प्रशासन यशस्वी होत असल्याचे दिसून येत आहे. देशार कोरोना बाधितांचा आकडा १५४ वर गेला असताना औरंगाबाद मध्ये मात्र कोरोना रुग्न न सापडल्याने हे दिलासादायक असल्याचे बोलले जात आहे. शहरातील एकमेव कोरूना पॉझिटिव प्राध्यापिकेच्या अगदी जवळून संपर्क आलेल्या … Read more

कोरोनाला फाट्यावर मारुन औरंगाबाद मनपाची ४०० कर्मचाऱ्यांची बैठक

Aurangabad Mahanagarpalika

औरंगाबाद प्रतिनिधी | राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीचे कामकाज थकीत ठेवावे असे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही औरंगाबाद महापालिकेच्या निवडणूक विभागाने कामकाज सुरू ठेवले आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता मौलाना आझाद संशोधन केंद्रात ४०० पेक्षा अधिक कर्मचार्‍यांची बैठक मनपाकडून आयोजित करण्यात आल्याचे समजत आहे. मतदार याद्या तयार करण्यासाठी सदर बैठक बोलावण्यात आली होती. कोरोनाच्या भीतीमुळे … Read more

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड

Aurangabad News

औरंगाबाद प्रतिनिधी । सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर बुधवारपासून औरंगाबाद महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्याला प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला. दंडात्मक कारवाई गुरुवारपासून आणखी व्यापक करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा प्रशासन कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कोरणा पसरवण्याचा अनेक कारणांमध्ये थुंकणे हे … Read more

अजिंठा-वेरूळ पर्यटनाला करोनाचा फटका; ७ एप्रिलपर्यंत लेण्या बंद

औरंगाबाद प्रतिनिधी । देशात करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे औरंगाबादमधील जगविख्यात अजिंठा आणि वेरुळ लेण्या बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. येत्या 19 मार्चपासून 7 एप्रिलपर्यंत वेरुळ आणि अजिंठा लेणी बंद राहणार आहेत. करोनाच्या प्रभावामुळे फक्त अजिंठा आणि वेरूळ लेण्यासोबतच ताजमहलची प्रतिकृती असलेला बीबी-का-मकबारा, औरंगाबाद लेणी, दौलताबाद (देवगिरी) किल्ला, पानचक्की इत्यादी पर्यटन स्थळेही प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय … Read more

कोरोनामुळं औरंगाबाद पालिकेचा मुशायरा रद्द; पोलिसांची संगीत रजनी मात्र रंगणार

औरंगाबाद प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात कुठेही सार्वजनिक कार्यक्रम घेऊ नये, असे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ८ मार्च रोजी मनपाने आयोजित केलेला मुशायरा रद्द केला आहे. परंतु, त्याच शहरात पोलिस आयुक्तांनी पोलिस कल्याण निधीसाठी आयोजित केलेला संगीत रजनी कार्यक्रम मात्र होणार असल्याचे जाहीर केले आहे.यावरून नागरिकांच्या आरोग्याचे पोलिस विभागाला काही देणे-घेणे नाही, असे … Read more

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । मनसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर दोन दिवसांपूर्वीच विराजमान झालेल्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती चौक पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याने क्रांतीचौक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अदालत रोडवर हर्षवर्धन जाधव यांच्या मालकीची जागा आहे. या जागेवर नितीन रतन दाभाडे वय-३० (रा.बनेवाडी) या तरुणाने काही दिवसांपूर्वी … Read more

शासन निर्णयामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील ३० शाळा कायमस्वरूपी होणार बंद! तर राज्यातील ९१७

औरंगाबाद प्रतिनिधी । जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ३० शाळा बंद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी दिली आहे. राज्यभरातील वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ९१७ शाळा बंद करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शाळांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा शासन निर्णयामुळे … Read more