शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या वादातून तरुणाची भोसकून खून; एकाला अटक, एक फरार

औरंगाबाद प्रतिनिधी । शिवजयंती मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोघांनी 21 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली मात्र एकजण फरार झाला आहे. जो पर्यंन्त दुसऱ्या आरोपीला अटक होत नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला होता. तर पुंडलिकनगर भागातील बाजारपेठतील दुकाने … Read more

सख्खा भाऊचं निघाला पक्का वैरी! भावानेच अंगावर रॉकेल टाकून भावाला जाळलं

औरंगाबाद प्रतिनिधी । घरघुती वादातून झालेल्या भांडणातून झोपलेल्या भावाच्या अंगावर रॉकेल ओतून भावानेच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास शहरातील बनेवाडी भागात समोर आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे बनेवाडी भागात राहणाऱ्या वरून मुकुंद कुमावत वय-32 या तरुणाला त्याच्याच भावाने जाळल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या धक्कादायक प्रकरणा विषयी जखमी कुमावत यांनी … Read more

औरंगाबादमध्ये बहिणीचे दागिने चोरणाऱ्या सख्ख्या भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सख्ख्या बहिणीचे चोरलेले चार तोळ्यांचे दागिने वाळूज एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याच्या पुण्यात राहणाऱ्या मित्राच्या घरातून जप्त केले. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या समशेर खान मैनुद्दीनखान यांच्या पत्नीचे चार तोळ्यांचे दागिने २५ जानेवारी रोजी चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी २९ जानेवारी रोजी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या चोरीचा तपास सुरू असताना समशेरखान याचा साला नरुल हसन मुस्तफाखान (२३) याला पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले.

केमीकल कंपन्या बंद करण्याच्या मागणीसाठी महिला चढली चक्क पाण्याच्या टाकीवर

शहरात केमिकल कंपन्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दूषित रसायन पाण्यात सोडण्यात येत असल्याने अंघोळीलाही पाणी नाही. या प्रकाराला कंटाळून एका महिलेने शहरातील शिवाजीनगरच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेत सदर प्रदूषणा महिलेला ताब्यात घेतलं.

पतंगाच्या नायलॉन मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी; विक्रेत्यांवर पोलिसांची थातुरमातुर कारवाई

नुकताच संक्रांत हा सण साजरा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले गेले. मात्र नायलॉन व मांजा वापरण्यास बंधी असतांना पतंगबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मांजा दोऱ्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरीक जखमी झाले आहेत. जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची शहरात बड्या व्यापाऱ्यांनकडून विक्री होत आहे. मात्र पोलिस छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष करून थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त करायचंय – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे असे विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान … Read more

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मराठवाडा विद्यापीठात मानवी साखळी

देशातील विद्यापीठ ही आंदोलनाची केंद्र का बनलीत याचा विचार करणं सध्या गरजेचं बनलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोध झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी चेहरे झाकलेल्या गुंडांकडून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत असून औरंगाबादमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली.

लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला, अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर भाजप नेत्याची प्रतिक्रिया

पुणे प्रतिनिधी | आता अशा बातम्या येत राहतील अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर भाजपमधील नेते अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून शिवसेनेवर तोंडसुख घेत आहेत. लग्नाला बोहल्यावर उभं राहण्याआधीच नवरा पळाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी तीन पायांच्या सरकारमध्ये काहीही … Read more

अब्दुल सत्तारांना मंत्री करुन उद्धव ठाकरेंनी त्यांचा सन्मान केला पण…

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. खातेवाटपाआधीच त्यांनी हे पाऊल उचलल्यानं खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी हा निर्णय घेतल्याचं बोलले जात आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान केला पण सत्तार का … Read more

अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटील म्हणतात…

मुंबई | शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा दिला. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून काहींना मात्र यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आता सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हि पहिली बातमी आहे. आता अशा अनेक बातम्या मिळतील असं … Read more