ये रिश्ता बहोत पुराना है; राऊतांकडून बाळासाहेबांसोबतचे जुने फोटो ट्विट

sanjay raut balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. हे नातं खूप जुने आहे…. ये रिश्ता बहोत पुराना है…. असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर केले आहेत. आज बाळासाहेब असते तर ढोंग्याना सोलून काढले असते…; सामनाचा … Read more

आज बाळासाहेब असते तर ढोंग्याना सोलून काढले असते…; सामनाचा विशेष लेख

Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून विशेष अग्रलेख लिहिण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्वच अचाट आणि अफाट होते. बाळासाहेबांच्या जीवनात व आचरणात ढोंगाला अजिबात स्थान नव्हते. त्यांनी ढोंगाचा नेहमीच तिरस्कार केला. आज बाळासाहेब असते तर या ढोंग्यांना शिवतीर्थावरच सोलून आणि पाहून काढले … Read more

बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर अगोदर हातातले खंजीर…; संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. या स्मृतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर अगोदर बाजूला ठेवा. मग त्याठिकाणी गेल्यावर नतमस्तक व्हा. … Read more

उद्धव ठाकरेंनीच माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकरांचा गंभीर आरोप

Gajanan Kirtikar Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन सोडत शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताच कीर्तिकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “2004 मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. पण शिवसेनाप्रमुख … Read more

बाळासाहेबांचे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray Balasaheb Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत माहिती दिली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे काम 58 टक्के पूर्ण झाले असून हे स्मारक प्रेरणा देणारे स्फूर्तीस्थान ठरेल, असे गौरवोद्गार ठाकरे यांनी काढले. मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे आज सादरीकरण करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव … Read more

शिंदे गटाने दिला ‘या’ 3 नावांचा पर्याय; केंद्रस्थानी बाळासाहेबच

Balasaheb Thackeray Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील ठाकरे – शिंदे सत्तासंघर्षात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी आयोगाने दोन्ही गटांना सोमवारी दुपारपर्यंत मुदत दिली होती. कालच उद्धव ठाकरेंनी आपल्या गटाकडून निवडणूक आयोगाला दिलेले पर्यायी चिन्ह आणि नावे जाहीर केली होती त्यांनतर आता एकनाथ शिंदे गटाकडूनही नव्या पक्षासाठी नावे आणि चिन्हे … Read more

मला सांभाळलंत, आता उद्धव आणि आदित्यला सांभाळा; बाळासाहेब शेवटच्या भाषणात काय म्हणाले होते?

uddhav balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचा दसरा मेळावा.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी  30 ऑक्टोबर 1966 ला शिवाजी पार्कवरून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली. …  दसरा मेळाव्यानिमित्त बाळासाहेब ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्कवरून विरोधकांवर आपल्या खास शैलीत टीका करत होते. तसेच शिवसेनेची आगामी वाटचाल स्पष्ट करत होते. मात्र 2012 ला बाळासाहेबांचे दसरा मेळाव्यातील भाषण अखेरचे ठरले. प्रकृती … Read more

बाळासाहेबांचा विश्वासू चंपासिंग थापाही शिंदे गटात सामील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह बंडखोरी केल्यानंतर आता बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे चंपासिंह थापा हेदेखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने चंपासिंह थापा ठाण्यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, आज … Read more

आदित्य ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, विचारांचे वारसदार नाहीत : गुलाबराव पाटील

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | आदित्य ठाकरें आताच वय 32 वर्षे आहे आणि मी शिवसेनेत 35 वर्षापासून काम करतोय. त्यामुळे आमच्यावर टीका करणारे आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार होऊ शकतात, पण ते विचारांचे वारसदार नाहीत. आदित्य ठाकरेंवर किती गुन्हे दाखल झाले? हे तुम्ही त्यांना विचारू शकता, ते कोणत्या तुरुंगात गेले हेही विचारा असा प्रतिप्रश्न शिंदे … Read more

बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले ..; राज ठाकरेंनी सांगितला शिवसेना सोडतानाचा प्रसंग

raj thackeray balasaheb thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे, गणेश नाईक, छगन भुजबळ यांच्या बंडाशी माझा संबंध लावू नका, मी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला नाही. मी कोणत्या दुसऱ्या पक्षात गेलो नाही तर स्वतः पक्ष स्थापन केला असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच एक प्रसंग सांगितला. मुंबईतील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. … Read more