संघर्षातून आलेला प्रत्येकजण सकारात्मक व विकासात्मक असतो : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील मुलांच्या जीवनात संघर्ष असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीचे मोल काय आहे, याची जाणीव करून देते. आपल्या मुलांना सर्व गोष्टी, वस्तू संघर्ष न करता मिळाल्यास त्याची किमंत त्यांना कळत नाही. त्यामुळे संघर्षातून घडलेला प्रत्येकजण यशस्वी होतोच. परंतु तो विकासात्मक व सकारात्मक असतो, असे मार्गदर्शन कराड शहर पोलिस … Read more

महाराष्ट्रात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जूनपासून : आ. चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली नविन शैक्षणिक जाहीर केलेले होते. संपूर्ण देशात एकच (काॅमन) तीन वर्षाचा अभ्यासक्रम असणार आहे. महाराष्ट्र राज्यात येत्या जून महिन्यापासून या राष्ट्रीय धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी जाहीर केले. कराड शिक्षण मंडळ व टिळक हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवात मंत्री … Read more

आदर्शवत : केसुर्डी गाव कारभाऱ्यांनी केला स्त्रीचा सन्मान, अन् पायपीट थांबली

Kesurdi Gram Panchayat

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नायगाव (ता. खंडाळा) या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या गावानजिक असलेल्या केसुर्डी ग्रामपंचायतीने स्त्री सन्मानाचा मोठा आदर्श घालून दिला. सरपंच व ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन गावातील 30 शाळकरी मुलींना सायकली पुरवल्या. त्यामुळे चालत जाणाऱ्या शाळकरी मुलींची पायपीट थांबणार आहे. केसुर्डी गावातील मुलींना व मुलांना शिक्षणासाठी दररोज किमान 5 ते 6 किलोमीटरचा पायी प्रवास … Read more

कोडोलीतील हायस्कूलास शिक्षक आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य

कराड | कोडोली येथील भारती विद्यापीठच्या हौसाबाई विठ्ठलराव पाटील प्रशाला कोडोली (ता. कराड) येथील हायस्कूलला शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आमदार फंडातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रम महात्मा गांधी विद्यालय उंब्रज येथे प्रमुख पाहुणे शिक्षक आमदार जयंत आसगावकर ( पुणे विभाग शिक्षक मतदार संघ) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पोतदार ए. … Read more

बारावी परीक्षेबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा; ‘या’ दिवशी स्वीकारले जाणार अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तथा बारावीच्या परीक्षेबाबत व अर्ज दाखल करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची घोषणा केली आहे. “बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती मंत्री गायकवाड … Read more

उच्च शिक्षणमंत्री उदय सामंतांनी दिली ‘हि’ महत्वाची माहिती; ‘या’ दिवशी सुरु होणार महाविद्यालये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेक दिवसांपासून राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. ती आता पुन्हा सुरू करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालये सुरु करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. येत्या 20 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू होणार … Read more

दहावी पास सर्वांनाच मिळणार अकरावीत प्रवेश, सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य

exams

औरंगाबाद |  मुल्यांकनाच्या आधारे जिल्ह्यातील दहावीचे 65 हजार 154 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यातील 426 शाळा महाविद्यालयात 72 हजार 860 जागा आहेत. त्यामुळे दहावी उत्तीर्ण सर्वांनाच अकरावीसाठी प्रवेश मिळणार आहे. शहरातील 116 महाविद्यालय यांसह सर्वच महाविद्यालयात ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असली तरी अकरावीची सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत प्राधान्य असणार आहे. सध्या … Read more

राज्यातील 40 हजार शिक्षकांची भरती होणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. सध्या राज्यातील अंदाजे 40 हजार शिक्षकांची पदं रिक्त असून ही पदं भरण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात होणार आहे. … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना

औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी एक खिडकी योजना व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. या उपक्रमाचा फायदा विद्यापीठाला झाला असून ११ देशांतील १०७ विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध विभागांत अध्यापन, संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे. मध्य-पूर्व अशिया देशातील विदेशी विद्यार्थ्यांचा पूर्वी औरंगाबादेत शिक्षणासाठी मोठा ओढा होता. मात्र मध्यतंरीच्या काळात विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत … Read more

शाळांमध्ये नवीन शिक्षण धोरण लागू करण्याचा प्लॅन तयार; हे ‘पोर्टल’ केले लाँच

नवी दिल्ली। नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण राबविण्यासाठी सरकार सध्या पूर्ण ताकदीने नियोजन करत आहे. 1986 मध्ये शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सहा वर्षे लागली होती. सध्याच्या सरकारने हा कृती आराखडा वर्षभरात तयार केला आहे. यासह, याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘सार्थक’ हे अँप पण लाँच केले गेले आहे. हे अँप पॉलिसीच्या अंमलबजावणीशी संबंधित विषयांवर राज्यांमधील पूल म्हणून काम … Read more