पहिली ते नववीच्या परीक्षा 15 एप्रिलनंतर

औरंगाबाद – पहिली ते नववीच्या मार्चअखेर होणाऱ्या परीक्षा 15 एप्रिल नंतर घेण्यात येतील असा ठराव मराठवाडा मुख्याध्यापक संघाने मांडला. 15 एप्रिल पर्यंत शिक्षकांच्या 100 टक्के उपस्थितीत पूर्णवेळ शाळा भरून अध्ययनक्षती भरून काढावी. त्यासाठी 30 एप्रिल पर्यंतचा प्रत्यक्ष शिक्षणाचा सूक्ष्म कृती आराखडा शाळांना, डाएट शिक्षण विभागाकडून देण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. सर्वच व्यवस्थापनाच्या … Read more

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू! मागील परीक्षेत सव्वालाख विद्यार्थी झालेत नापास

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या मागील ऑनलाइन परीक्षेत तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थी नापास झाल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन परीक्षात विद्यार्थ्यांची प्रचंड गुणवत्ता वाढली आहे, तर दुसरीकडे नापासांची संख्याही भरमसाठ आहे. याबद्दल पालक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 सत्र परीक्षेसाठी प्राप्त आवेदन पत्रांचे अवलोकन … Read more

दहावी बारावीचे परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

Exam

औरंगाबाद – औरंगाबाद विभागीय मंडळातील जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी 408 मुख्य केंद्रे निश्चिती झाली होती. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी एक हजार 822; तर बारावीसाठी 855 या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात येत आहे. दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा … Read more

विद्यापीठाच्या पदवी परीक्षा ‘या’ तारखेपासूनच

bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने सर्व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या हिवाळी सत्र परीक्षांसाठी आवेदन पत्र भरण्यास 31 जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ दिली. पण या ऑनलाइन परीक्षा मात्र 8 फेब्रुवारीपासूनच घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक काल विद्यापीठाने काढले. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील सत्र परीक्षा फेब्रुवारी मार्चमध्ये होणार आहेत. यासाठी आवेदनपत्र भरण्याची मुदत 20 जानेवारीपर्यंत होती. ती रोज 10 … Read more

आज एमपीएससीची राज्यसेवा पूर्व परीक्षा

MPSC

औरंगाबाद – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आज 23 जानेवारी रोजी होणार असून, 47 केंद्रांवर 15 हजार 234 उमेदवारांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी 10 ते दुपारी 12 व दुपारी 3 ते संध्याकाळी 5 अशा दोन सत्रात ही परीक्षा होईल. परीक्षेसाठी 1 हजार 726 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी … Read more

शिक्षण मंडळाकडून बोर्डाच्या परीक्षेसाठी केंद्रांची निश्चिती

Exam

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी मंडळाकडून सध्या तयारी सुरु केली आहे. परीक्षेसंदर्भात मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विभागात बारावीसाठी 412; तर दहावीसाठी 629 केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून 1 … Read more

दहावी, बारावी परीक्षेसाठी औरंगाबाद विभागात 3 लाख विद्यार्थ्यांचे अर्ज

औरंगाबाद – दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. दहावीसाठी आतापर्यंत 1 लाख 77 हजार 135 तर बारावीसाठी 1 लाख 61 हजार 942 विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती विभागीय मंडळाचे प्रभारी सचिव आर. … Read more

म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; जितेंद्र आव्हाड यांचे मध्यरात्री ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | म्हाडाची आज रविवारी होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांची मध्यरात्री ट्वीट करत ही माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे म्हाडा आणि … Read more

दोन वर्षांनंतर भावी शिक्षकांसाठी आज टीईटी परीक्षा

औरंगाबाद – राज्य शिक्षण परिषदेतर्फे तीन वेळेस पुढे ढकलल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दोन वर्षानंतर आज सकाळी 10 ते दुपारी एक आणि दुपारी दीड ते साडेचार या दोन सत्रात होणार आहे. या दोन्ही पेपरसाठी जिल्ह्यातील एकूण 16 हजार 236 परीक्षार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून केंद्रावर 144 अन्वये मनाई आदेश … Read more

भरती परीक्षेचे ‘आरोग्य’ बिघडलेलेच ! एका उमेदवाराला आले तब्बल 34 हॉलतिकीट

बीड – आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होत आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 हॉलतिकीट आले आहेत. प्रत्येकावर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. आता या विद्यार्थ्याने परीक्षा द्यायची कुठे? असा प्रश्न आहे. यानिमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पृथ्वीराज अरुण गोरे (रा. … Read more