तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, गोव्याच्या सेशन कोर्टाचा निर्णय

Tarun Tejpal

पणजी : वृत्तसंस्था – तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना गोव्यातील सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्यावर 2013 मध्ये गोव्यातील लक्झरी हॉटेलच्या लिफ्टमध्ये एका महिला सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. नोव्हेंबर 2013 मध्ये गोवा पोलिसांनी तेजपाल यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून त्यांना अटक केली होती. मे 2014 त्यांना जामीन मंजूर झाला … Read more

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्यामुळे 22 वर्षीय महिलेची आत्महत्या; प्रियकरावर FIR दाखल

Sucide

सांगली : हॅलो महाराष्ट्र – प्रियकराने दिलेले लग्नाचे वचन न पाळल्याने एका 22 वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. हि घटना 10 मे रोजी शामरावनगर या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या प्रियकराविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सरोजा गजानन आवळे असे आहे. सरोजा आवळे यांच्या आई शेवंती … Read more

तुमच्या बाबतीत गुन्हेगारी गोष्ट घडलीय अन् पोलिस FIR नोंदवून घेत नाहीयेत? तर त्यांना ‘हे’ सांगा

FIR

कायद्याचं बोला #9 | स्नेहल जाधव गुन्हा झाल्यावर तो कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवावा यावरून बऱ्याच लोकांना माहित नसतं त्यामुळे बऱ्याचदा लोकांची तारांबळ उडते. गुन्हा घडलेली जागा आमच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून काही पोलीस गुन्ह्याची नोंद घेणं टाळतात. पीडित व्यक्तीला तर ह्या गोष्टीचा मनस्ताप होऊच शकतो शिवाय चौकशी करण्याचा महत्वाचा वेळ निघून गेला … Read more

गनीमीकाव्यानं अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण आलं गोपीचंद पडळकरांच्या अंगाशी; गुन्हा दाखल

पुणे । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय. मात्र, हे प्रकरण पाडळकरांच्या चांगलाच अंगाशी आलं आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात … Read more

मोदींच्या मतदारसंघात गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात FIR दाखल; ‘हे’ आहे कारण

वाराणसी । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघात एक कमालीची घटना समोर आली आहे. वाराणसीमधील भेलूपूर पोलीस ठाण्यात थेट गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात दाखल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सुंदर पिचई यांच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि कटकारस्थान रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुंदर पिचई यांच्यासह या एफआयआरमध्ये एकूण १८ जणांविरोधात आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा … Read more

या ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित नियम मोडले

मुंबई | बॉलिवूड अभिनेता अरबाज खान, निर्वान खान आणि सोहेल खान यांच्याविरोधात सोमवारी (4 जानेवारी 2021) कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) च्या तक्रारीनंतर मुंबईतील खार पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 188 आणि कलम 269 अन्वये एफआयआर नोंदविण्यात आला आहे. An FIR has been registered against actors … Read more

क्रिकेटर सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश … Read more

जळगाव जिल्ह्यात माजी सरपंचावर थरारक खुनी हल्ला, 8 जणांवर FIR दाखल

जळगाव । शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर 8 जणांनी हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत माजी सरपंच मधुकर दौलत पाटील (वय-57 रा. … Read more

‘गुन्हे दाखल करण्याचं सत्र माझ्यापर्यंत आलं तर’… दसरा मेळाव्याप्रकरणी FIR झाल्यावर पंकजांची प्रतिक्रिया

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यातील गर्दी प्रकरणी भाजप नेत्या पंकजा मुंडेंसह 40 ते 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये रासप नेते महादेव जानकर, रमेश कराड यांचाही समावेश आहे. अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंकजासह इतर जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला. यावर पंकजा मुंडेंनी “दसऱ्याला भगवान बाबांच्या … Read more

राहुल-प्रियंका गांधींसह 200 जणांवर उत्तर प्रदेश पोलिसांकडून FIR दाखल

नवी दिल्ली । हाथरस सामूहिक बलात्कार पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना गुरुवारी यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबाच्या भेटीसाठी ते पायी प्रवास करत रवाना झाले. मात्र त्याचवेळी राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, राहुल आणि प्रियंका गांधींसह तब्बल 200 … Read more