कोरोनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । देशात करोनाचं संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत चाललं आहे. केंद्र सरकार असो देशातील राज्य सरकारे करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशातील सर्व आर्थिक, सामाजिक व्यवहार बंद आहेत. अशा सर्व बिकट परिस्थितीत चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more

Breaking | देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार; २४ तासात ५२५ रुग्णांची भर

नवी दिल्ली। देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासात ५२५ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानं चिंतेत आणखी भर पडली आहे. या नवीन ५२५ रुग्णानंतर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार ३७२ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत देशात ७५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशात सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. तर त्यानंतर … Read more

शाहरुख खानने क्वारंटाइन सेंटर बनवण्यासाठी दिली स्वत:ची इमारत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला (बीएमसी) त्याच्या चार मजली खासगी कार्यालयाची जागा देण्याची ऑफर दिली, जेणेकरून या जागेचा उपयोग महिला, मुले आणि वृद्धांना क्वारंटाइन ठेवण्यासाठी होईल.सध्या, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढा जिंकण्याचा प्रयत्न करीत आहे, अशा परिस्थितीत शाहरुखने पुन्हा मदतीचा हात देऊन लोकांची मने … Read more

धारावीत करोनाचा चौथा रुग्ण, मुंबईसाठी धोक्याचा इशारा

मुंबई । धारावीत करोनाचा चौथा रुग्ण आढळल्याने मुंबईसाठी धोक्याचा इशारा मानला जातो हे. धारवी येथील बलिगा नगरमध्ये आणखी एक रुग्ण आढळला आहे. एका ३० वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचं कळतं आहे. आतापर्यंत धारावीत ४ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दिल्लीच्या मरकजसाठी गेलेले ५ जण धारावीत गेले होते. ते पाचही जण धारावीत राहिले होते. ज्याच्या फ्लॅटमध्ये हे … Read more

कोल्हापूरात लॉकडाऊनमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांचा दणका! जप्त केली २ हजार वाहन

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विनाकारण, हुल्लडबाज पणे रस्‍त्‍यांवरून फिरणारेही आहेत. अशा वाहन धारकांवर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई करत आज अखेर सुमारे २ हजार वाहने जप्त करण्यात आली आहेत. कोल्हापूरातल्या शहर … Read more

देशात कोरोनाचे ‘हे’ पाच हाॅटस्पाॅट, यात तुमचे राज्य, शहर तर नाही ना? घ्या जाणुन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कोरोना विषाणू देशातील प्रत्येक राज्यात पसरला आहे. आतापर्यंत २५०० हून अधिक लोक या विषाणूला बळी पडले आहेत आणि ६० हून अधिक लोक मरण पावले आहेत. अशातच काही शहरे आहेत जी कोरोना विषाणूची ‘हॉटस्पॉट्स’ बनली आहेत. म्हणजेच या शहरांमध्ये इतर शहरांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार महाराष्ट्र, तामिळनाडू, … Read more

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘उबर’ सुरु करणार फ्री राईड

नवी दिल्ली । करोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह्य ट्रान्सपोर्ट उपलब्ध करण्यासाठी आता उबरने पुढाकार घेतला आहे. नॅशनल हेल्थ सर्विस प्रोवायडरने उबरसोबत करार केल्याचं सांगितलं आहे. या करारांतर्गत उबर सुरुवातीच्या टप्यात दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, कानपूर, लखनऊ, प्रयागराज आणि पटना येथील डॉक्टरांसाठी १५० गाड्यांची फ्री सर्विस उपलब्ध करून देणार आहे. सर्व … Read more

देशात आत्तापर्यंत २९०२ कोरोनाग्रस्त, ६८ जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोना विषाणूचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोव्हीड-१९ चे २६५० सक्रिय रुग्ण आढळले आहेत, तर आतापर्यंत २९०२ पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे.भारतामध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ६८ लोकांचा मृत्यू झाला आहे.१८३ बरे झाले अथवा सोडण्यात आले. एकूण पुष्टी झालेल्या प्रकरणात माइग्रेटेड पेशंटचा देखील समावेश आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री … Read more

करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई । करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. तो म्हणजे समाजात दुही माजवण्याचा. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. तेव्हा दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच असा … Read more

Video: अटलजींची कविता शेअर करत मोदी म्हणाले.. ”आओ दीया जलाएं”

नवी दिल्ली । पंतप्रधान मोदींनी काल पुन्हा एकदा जनतेला संबोधित करत लोकांकडून ९ मिनिटे मागितली आहेत. रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ९ मिनिटाला प्रकाश पसरवण्यास सांगितले. या दिवशी सर्वानी घरातील दिवे बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅशलाइट लावण्याचे आवाहन देशातील १३० कोटी जनतेला केलं आहे. आपण सर्वानी करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून … Read more