थकीत बिल वसुलीसाठी कनेक्शन तोडले, ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सब स्टेशनलाच टाळे ठोकले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील मसूर येथे महावितरण कंपनीच्यावतीने थकीत बिल वसुलीसाठी मसुर गावच्या पाणीपुरवठ्याचे विद्युत कनेक्शन बंद केल्याचा प्रकार केला. त्यामुळे मसूरच्या सुरळीत पाणीपुरवठा काहीकाळ बंद झाला. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरणचे सबस्टेशन टाळे केले. याबाबत अधिक माहिती अशी, मसूर येथील ग्रामपंचायतीचा 12 वर्षापासून  महावितरण कंपनीकडे लाखो रुपयांचा … Read more

महावितरणाचा गलथान कारभार, शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत15 एकर ऊस जळून झाला खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कडेगाव येथील बारा पट्टा परिसरातील सुमारे 15 एकरातील उसाचे फड शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले. महावितरणच्या गलथान आणि भोंगळ कारभारामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही दिवसातच कारखान्यास सदर ऊस गाळपासाठी जाणार असताना ही घटना भर दुपारी 1 वाजता घडली. दरम्यान येथील स्थानिक शेतकऱ्यांनी आग विजवण्याचे … Read more

बोगस रिडींग पाठविताना रंगेहाथ पकडले, उपसरपंचांकडून महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे एकाच ठिकाणी बसून बोगस रिडींग पाठविताना एकास रंगेहाथ पकडले. उपसरपंच मोहन पाटील यांनी महावितरणच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश केल्यामुळे महावितरण कडून येणाऱ्या अवाजवी व बोगस बिलाबाबत स्पस्ट पुरावाच सापडला आहे. याबाबतचा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आज सर्वत्र या व्हिडीओची व महावितरणच्या भोगळ … Read more

परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; संतप्त जमावाकडून रस्तारोको

परभणी प्रतिनिधी | परमिट घेऊन विद्युत खांबावर दुरुस्तीसाठी चढलेल्या युवकाला अचानक आलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसल्याने खांबावरून पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात असणाऱ्या एकता नगर मध्ये घडली. याप्रकरणी सदरील युवकाच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई मिळावी यामागणीसाठी रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मृत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय … Read more

महावितरणच्या वाहनावर चोरांचा डल्ला; भरदिवसा दोन लाख लंपास

औरंगाबाद – वैजापुरातील महावितरणच्या कार्यलायसमोरील वाहनातून दोन लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. शेतकऱ्यांच्या कृषीपंपांच्या वीजबिलापोटी वसूल केलेली ही रक्कम होती. ही रक्कम महावितरणच्या कार्यालयासमोरील वाहनात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास वाहन चालक आणि कर्मचारी ही रक्कम वाहनात ठेवूनच चहा प्यायला गेले होता. हाच बेजबाबदारपणा कर्मचाऱ्यांना भोवला आणि चोरट्यांनी वाहनाची काच फोडून त्यातून … Read more

जायकवाडी धरण तुडुंब भरलेले असताना जल विद्युत प्रकल्प बंद

jayakwadi damn

औरंगाबाद – जायकवाडी धरणात जलसाठा उपलब्ध असताना वर्षभर प्रकल्प बंद ठेवण्याची नामुष्की महापारेषण कंपनीवर ओढवली आहे. चाळीस वर्षांपूर्वी जपानी बनावटीच्या मशिनरीमध्ये दुरुस्ती सुरू असताना अनेक पार्ट निकामी झाल्याचे समोर येत आहे. या मशिनरीचे तंत्रज्ञही लवकर उपलब्ध होत नसल्याने हा जलविद्युत प्रकल्प कधी चालू होईल, याबाबत मात्र अनिश्चितता निर्माण झाली आहे. डिसेंबर 2019 पासून जलविद्युत प्रकल्पाला … Read more

अनोखी शक्कल ! टाचणीच्या मदतीने तीन लाखांची वीजचोरी; प्रकार पाहून महावितरणही चक्रावले

mseb

औरंगाबाद – वीज चोरीसाठी कोण काय करेल याचा नेम नाही. एका कारखान्यात चक्क टाचणीचा वापर करून तीन लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मंगळवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महावितरण देखील चक्रावून गेले आहे. नारेगावातील सिसोदिया इंडस्ट्रियल इस्टेटमधील हिलाबी इंजिनिअरिंग वर्क्समध्ये प्लास्टिक बॉटल तयार केल्या जातात. महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी … Read more

शेतकऱ्यांने स्वतःला घेतले पुरून : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरण विरोधात आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महावितरणकडून काही दिवसांपूर्वी शेती पंपाची वीज जोडणी तोडली आहे. त्याविरोधात पुसेसावळी परिसरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करुन वीज जोडणी करण्याची मागणी केली होती. परंतु, या आंदोलनाची दखल न घेता उप अभियंता धर्मे यांनी वीज कनेक्शन कट करण्याचा धडाका सुरूच आहे. या विरोधात सुहास पिसाळ यांनी महावितरण कार्यालयासमोर जमिनीत गाडून घेत महावितरणकडून … Read more

सावधान ! जर वीज बिल भरले नसेल तर तुमचा वीज पुरवठा होऊ शकतो खंडित; महावितरणची मोहीम

mseb

औरंगाबाद – ज्या ग्राहकांनी आतापर्यंत थकलेले वीज बिल भरले नाही किंवा वारंवार सूचना करूनही त्यास पाठींबा दिला नाही, अशा वीज ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. महावितरणणे आता थकबाकी वसुली मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवणे सुरु केले असून आजपर्यंत मराठवाड्यातील तब्बल 16 हजार 260 थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. ही कारवाई टाळण्यासाठी चालू बिलासह थकबाकीचा … Read more

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट; बिलाची सक्तीने वसुली सुरु

MSEDCL

औरंगाबाद : औरंगाबाद परिमंडळातील व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 5 लाख 30 हजार 89 ग्राहकांकडे 392 कोटी 66 लाखांचे वीज बिल थकले आहे. ग्राहक विजेचे बिल नियमित भरत नाहीत. त्यामुळे महावितरणने थकबाकीदरांचा विजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक स्तिथी बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही, तर विजपुरवठा खंडित … Read more