पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे शोषण नाही; आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीची उच्च न्यायालयाकडून मुक्तता

नागपूर | पत्नीकडे सतत पैश्यांची मागणी करणे हे उत्पीडन होणार नाही. त्यामुळे आरोपीवर भारतीय दंड संहिता IPC 498 A अनुसार गुन्हा दाखल करता येणार नाही. असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. एका आत्महत्येच्या केस संदर्भात हा निर्णय दिला गेला आहे. लग्नाच्या नऊ वर्षानंतर सतत पैश्यांच्या मागणीला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली. पतीवरती … Read more

मुंबई हायकोर्टाचा आणखी एक वादग्रस्त निर्णय; अल्पवयीन मुलीसमोर पँटची झिप उघडणं लैगिक गुन्हा नाही

नागपूर । मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं अल्पवयीन मुलीच्या छातीला थेट स्पर्श (स्कीन टू स्कीन) न झाल्यास लैगिक गुन्हा ठरणार नसल्याचा निकाल दिल्याचं प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका निकालानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अल्पवयीन मुलीचा हात पकडणे व आरोपीने त्याच्या पँटची झीप उघडणे पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार होत नाही, त्यामुळे आरोपीला केवळ विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा … Read more

प्रौढ तरुणीला जोडीदार निवडण्याचा अधिकार; हायकोर्टने प्रेमी जोडप्याला आणले एकत्र

मुंबई । ‘प्रौढ तरुणीला तिचा आयुष्यभराचा साथीदार निवडण्याचा व त्याच्याशी विवाह करण्याचा अधिकार आहे. तिच्या या अधिकारावर व स्वातंत्र्यावर तिचे पालक किंवा न्यायालयही गदा आणू शकत नाही’, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका जोडप्याला मंगळवारी पुन्हा एकत्र आणले. ‘प्रेयसीसोबत मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंधित आहेत. माझे शिक्षण पूर्ण होताच तिच्यासोबत विवाह करण्याचे माझे नियोजन होते. … Read more

‘फक्त बनावट नोटा बाळगल्या म्हणून गुन्हा दाखल होऊ शकत नाही’; जाणून घ्या हायकोर्टाचे म्हणणं तरी काय?

मुंबई । गेल्या वर्षी पुण्यातील अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाच्या अधिकाऱ्यांना एका कारमध्ये ५लाख ६४ हजार ५०० रुपये मूल्याच्या बनावट नोटा आढळल्या. यांनतर कारमधील दोघा तरुणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, तरुणांच्या जमीन अर्जावर सुनावणी वेळी मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना जमीन मंजूर करत, ‘बनावट नोटा केवळ बाळगल्याच्या कारणाखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे निरीक्षण … Read more

अर्णब गोस्वामींना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार; कोठडीतील मुक्काम वाढणार?

मुंबई । अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तातडीने अंतरिम जामीन देण्यास हायकोर्टाने गुरुवारी नकार दिला. मूळ तक्रारदार आणि पोलिसांचं म्हणणं ऐकल्याशिवाय अंतरिम दिलासा देण्याचा निर्णय दिला जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटलं. अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांना प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत. (mumbai hight court reject bail arnab goswami) … Read more

शाब्बास!! मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम केलं; हायकोर्टाची कौतुकाची थाप

मुंबई । कोरोना महामारीच्या काळात मुंबई पोलिसांच्या कामाचं मुंबई उच्च न्यायालयाने तोंडभरुन कौतुक केलं आहे. आजूबाजूला इतकी विपरीत परिस्थिती असताना कोरोनाच्या थैमानात कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असतानाही मुंबई पोलिसांनी आपलं कर्तव्य पार पाडलं अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांची पाठ थोपटवली आहे. तसेच मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनच्या काळात मोठ्या तणावात आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यामुळे नागरिकांनी … Read more

TRP घोटाळाप्रकरणी कोर्टाचं महत्वाचे निरीक्षण; अर्णब यांना इतर आरोपींप्रमाणेच समन्स बजावले जावे परंतु…

मुंबई । मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलेल्या टीआरपी घोटाळा (TRP Scam) उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे नाव आले आहे. (Republic TV)त्यानंतर एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि या वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी मुंबईत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवर आज सुनावणी झाली असून कोर्टानं अर्णब गोस्वामी यांच्या चौकशीनंतर त्यांच्या … Read more

वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाही; प्रत्येक महिलेला व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार- मुंबई हायकोर्ट

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयानं आज वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना दिलासा दिला आहे. याशिवाय वेश्या व्यवसायाशी संबंधित एक महत्वाचे विधान मुंबई उच्च न्यायालयानं यावेळी केलं आहे. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायद्याचा मूळ उद्देश हा वेश्या व्यवसायाचं निर्मुलन करणं किंवा या व्यवसायातील महिलांना शिक्षा करणं हा नाही. कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. व्यावसायिक हूतेनं एखाद्या … Read more

ईडीच्या दिरंगाईमुळं येस बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान बंधूंना मिळाला जामीन

मुंबई । येस बँक घोटाळ्यात मनी लाॅंडरिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेले मुख्य आरोपी असलेले दिवाण हौन्सिंग फायनान्सचे प्रवर्तक कपील वाधवान आणि धीरज वाधवान यांना आज अखेर जामीन मिळाला आहे. सक्तवसुली संचनालयाला (ईडी) वाधवान बंधूविरोधात हायकोर्टात पुरवणी आरोपपत्र सादर करण्यास एक दिवसाची दिरंगाई केल्यानं त्याचा फायदा वाधवान बंधूना मिळाला. हायकोर्टाने तांत्रिक कारणाच्या आधारे त्यांना जामीन मंजुर केला … Read more

अर्णब गोस्वामीला हायकोर्टाचा झटका! चौकशीला हजर राहण्याचे दिले आदेश

मुंबई । रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक पत्रकार अर्णब गोस्वामी यांना मुंबई हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशीला बोलावल्यानं त्याविरोधात गोस्वामी यांनी तातडीनं याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं अर्णब गोसस्वामीने चौकशीला न जाण्यासंदर्भांतील दिलेली कारण फेटाळून लावत मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात चौकशीसाठी … Read more