Maratha Reservation : मला तर आता जगायचीसुद्धा इच्छा राहिली नाही; नरेंद्र पाटील झाले भावूक

Narendra Patil

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठा आरक्षणाच्या निकालावर माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी भावुक होऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात आज जो निकाल आला तो अतिशय धक्कादायक आहे. आशा होती कि या निकालानंतर मराठ्यांना न्याय मिळेल पण आपले दुर्भाग्य. माझ्या वडिलांनी याच मराठा आरक्षणासाठी आपला जीव दिला आहे. या मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर मराठा … Read more

राज्य सरकारच्या असमन्वयामुळे आरक्षण रद्द : देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

Devendra Fadanvis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी करण्यात आली . तेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. या अगोदर सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती … Read more

मराठा आरक्षण टिकणार ? उद्या सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टत आव्हान देण्यात आले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या ऐतिहासिक निर्णय देणार आहे. उद्या सकाळी मराठा आरक्षणावर सुनावणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. Supreme Court to pronounce its judgement tomorrow on petitions challenging the constitutional validity of a Maharashtra … Read more

लोकांनी पहिले कोविड-19 च्या नियमांचे पालन करावे; मगच सरकारला दोष द्यावा: मुंबई उच्च न्यायालय

  मुंबई । कोविड -19 मधील वाढत्या प्रकरणांमध्ये सरकारला दोष देण्यापूर्वी लोकांनी संयम दाखवावा आणि शिस्तचे पालन करावे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. साथीच्या रोगासंदर्भात विविध मार्गदर्शक सूचना जारी करताना कोर्टाने ही टीका केली. सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबदार यांच्या खंडपीठाने लोकसेवक, डॉक्टर आणि पॅरामेडिकल कर्मचार्‍यांसह सर्वांना घराबाहेर निघताना आधार … Read more

मोठी बातमी : अनिल देशमुखांच्या चौकशीसाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनिल देशमुख यांनी अखेर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची CBI चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता CBIची टीम आताच मुंबईत दाखल झाली … Read more

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, कितीही धमक्या दिल्यात तरी मी मागे हटणार नाही – याचिकाकर्त्या जयश्री पाटील आक्रमक

anil deshmukh jayashri patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणावर सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्लाबोल केला अनिल देशमुख ही मोघलाई नाही, इकडे तुमचे राज्य … Read more

अनिल देशमुखांवरील आरोपांची होणार सीबीआय चौकशी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

anil deshmukh parambir singh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी सीबीआय कडून करण्यात येईल असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचं आदेशात म्हटलं आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख … Read more

घरातील कामे करणे ही फक्त पत्नीची जबाबदारी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबई | पती म्हणजे एका पत्नीचे सर्वस्व! त्याला खुश ठेवण्यासाठी पत्नीचा जन्म असतो, असे आपली पितृसत्ताक समाज पद्धतीमध्ये शिकवले जाते. यामुळे पत्नीने पतीचे सर्व कामे करणे बंधनकारक आणि कर्तव्ये समजून करणे बंधनकारक असल्याचे समाजामध्ये रूढ झाले असल्याचे पाहायला मिळते. अश्यातच एखाद्या पत्नीने, पतीने सांगितलेले काम करणे नाकारले तर पती कुठल्याही थराला जाऊ शकतो. पत्नीने चहा … Read more

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा! लवकरच मिळणार पदोन्नती

मुंबई | भरतीमध्ये आरक्षण असल्यानंतर पदोन्नतीमध्ये आरक्षण दिले जात होते. पण 2017 पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केले गेले होते. त्यानंतर आता शासनाने एक जीआर काढून पदोन्नतीच्या जागा भरल्या जाऊन, तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येण्याचे राज्य शासनाने म्हटले आहे. श्री. घोगरे यांनी सर्व स्तरावरील … Read more

पॉक्सो कायद्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ न्यायाधिशांना कंडोमची पाकिटे भेट

नवी दिल्ली | पॉक्सो कायद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पुष्पा गाणेडीवाल यांनी दिलेल्या निर्णयावर मध्यंतरी बराच वाद झाला. या निर्णयांमध्ये न्यायमूर्ती गाणेडीवाल यांनी असे म्हटले होते की, ‘मुलीने कपडे घातले असताना तिच्या छातीला स्पर्श करणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नाही’. त्यांच्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक कायदे तज्ञांनी आणि सोशल मीडियावर त्यांच्या … Read more