विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित; एकनाथ खडसेंनाही मिळणार तिकीट?

मुंबई । महाविकासआघाडी सरकारकडून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी अखेर नावे निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. एकूण 12 जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. यापैकी एका जागेवर भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसे यांना संधी मिळेल. तर उर्वरित तीन जागांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, … Read more

बिहार निवडणूक राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ; शिवसेनेशी युती नाहीच

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणूक जवळ आल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.बिहार मध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीही निवडणूक लढवणार आहेत. नितीश कुमार आणि भाजप यांची आघाडी आधीच ठरली असून आता शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचीही युती होईल अशी अपेक्षा होती परंतु बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. बिहारमध्ये शिवसेनेसोबत युती करणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते … Read more

अखेर मुहूर्त ठरला.. एकनाथ खडसेंचा ‘या’ पक्षामध्ये प्रवेश निश्चित?

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते तथा सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी अजिंठा शासकीय विश्रामगृह खडसेंच्या पक्षांतराचे संकेत दिले होते. अखेर, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज जामनेर येथील कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला खडसे जाणार का … Read more

एकनाथ खडसे भाजपला रामराम करणार हे निश्चित; ‘या’ मंत्र्याने दिले स्पष्ट संकेत

जळगाव । भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम करून राष्ट्रवादीत जाणार अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने अगदी सूचक प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, … Read more

बिहार निवडणुकीसाठी शिवसेना -राष्ट्रवादीमध्ये खलबते ?? राऊत -पवार भेटीने चर्चांना उधाण

Raut and Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार मध्ये निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवणं हे एकमेव ध्येय समोर आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांच्यात काल झालेल्या भेटीने पुन्हा खळबळ उडाली असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या … Read more

सोलापुरात एमआयएम-शिवसेनेला पडणार भगदाड? तौफिक पैलवान, महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार

सोलापूर । सोलापूरच्या राजकारणात आता नवी घडामोड घडताना दिसत आहे.एमआयएमचे तौफिक पैलवान आणि शिवसेनेनेचे महेश कोठे राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार असल्याची प्रबळ शक्यता वर्तवली जात आहे. या दोघांनी पक्षांतर केल्यास सोलापुरात एमआयएम आणि शिवसेनेला मोठं भगदाड पडणार आहे. हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर गेल्यास सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असल्याचे बोललं जात आहे. दोघेही मूळचे काँग्रेसी, पण.. … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूक लढवणार ; स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

sharad pawar ncp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बिहार विधानसभा निवडणुक लढवण्याच्या तयारीत असून बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने 40 स्टार प्रचारकांची यादी केंद्रीय कार्यालयातून जाहीर केली आहे. बिहार निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्य स्टार प्रचारक पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस बिहार निवडणूकीबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक जाहीर करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार … Read more

रुग्णालयात असलेल्या माजी आमदार कुलकर्णींच्या पत्नीला अजितदादांनी केली ३ लाखांची मदत

Ajit Pawar

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा कुलकर्णी यांच्या उपचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन लाखाची मदत केली आहे.स्वप्नगंधा कुलकर्णी आजारी असून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे ही बाब अजितदादांच्या कानावर गेल्यावर त्यांनी तातडीने तीन लाख रुपयांची मदत केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गुरुनाथ कुलकर्णी यांच्या पत्नी स्वप्नगंधा … Read more

राष्ट्रवादीकडून कुठलीही ऑफर नाही! एकनाथ खडसेंचा जाहीर खुलासा, पण जर..

जळगाव । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपच्या नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर स्वत: खडसे यांनी आज याविषयी खुलासा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत आपण कोणताही निर्णय घेतलेला नाही. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला तसा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्टीकरण एकनाथ … Read more

‘कितीही मोठी ऑफर दिली तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही’- सुधीर मुनगंटीवार

मुंबई । भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशा वेळी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ खडसेंना दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी ते भाजप सोडून जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे. “दुसऱ्या पक्षाने कितीही मोठी ऑफर दिली, तरी खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात … Read more