खावून खावून 50 खोके, माजलेत बोके; शंभूराज देसाईंच्या मतदार संघात शेतकर्‍यांची घोषणाबाजी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी शिंदे गटाचे आमदार तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मतदार संघातील तरुण शेतकऱ्यांनी शिंदे-फडणवीस सरकार विरोधात मोर्चा काढला. यावेळी “खावून खावून 50 खोके, माजलेत बोके-माजलेत बोके” अशा घोषणा आक्रमक शेतकऱ्यांनी दिल्या. पाटण तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच सरकारकडून स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर … Read more

पाटणचं राजकारण तापलं! पोलिस प्रशासन अन् सत्यजित पाटणकर यांच्यात झटापट

police administration and Satyajit Patankar in Patan (1)

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मानवी हक्क संरक्षण समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे गट यांच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारविरोधा आज पाटण येथील प्रांताधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांचे निवेदन स्विकारण्यासाठी प्रांताधिकारी लवकर येत नसल्याने राष्ट्रवादीचे नेते सत्यजित पाटणकर, राजाभाऊ शेलार यांनी पोलिसांचा बंदोबस्त धुडकावून, बॅरिगेट हटवून थेट प्रांताधिकारी कार्यालयात धडक … Read more

कोयना धरणातून सिंचनासाठी नदीपात्रात 1500 क्युसेक्स सोडले पाणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोयना धरणाची महाराष्ट्राची भाग्यरेषा अशी ओळख आहे. या धरणाच्या पायथा वीज गृहातील दोन्ही युनिट मधून आज दुपारी एक वाजता 1 हजार 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. कृष्णा व कोयना नदीकाठावरील परिसरातून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पिकांना … Read more

शंभूराज देसाईंच्या प्रयत्नातून तीन गावांचा पाणी प्रश्न मार्गी

Darholi Water Supply Scheme Bhoomipujan

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नातून दाढोली, मसुगडेवाडी, महाबळवाडी गावासाठी जल जीवन मशीन योजने अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या यायोजनेच्या कामाचा भुमिपुजन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती पाटणचे अध्यक्ष भरत भाऊ साळुंखे, माजी संचालक प्रकाश नेवगे, लोकनेते बाळासाहेब … Read more

दुचाकी-सुमो अपघातात 10 वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जण जखमी

student death accident wo-wheeler and a sumo car

पाटण प्रतिनिधी | सकलेन मुलाणी दहावीच्या निरोप समारंभादिवशी दुचाकी-सुमो कारच्या अपघातात दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मरळी येथे आज घडली आहे. या अपघातात प्रतिक रमेश पाटील (वय 16) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. दहावीच्या परीक्षेच्या तोंडावर झालेल्या दुर्दैवी अपघातामुळे शालेय विद्यार्थ्यांसह परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात … Read more

शंभुराज देसाई लक्षात ठेवा इलाका तुम्हारा, लेकिन धमाका हमारा होगा ! ; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल

Sushma Andhare Shambhuraj Desai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई हे सूड भावनेने राजकारण करत आहेत. येणाऱ्या काळातत्यांना गुलाल मिळू द्यायचा नाही. तुमच्या बालेकिल्ल्यात मी येऊन बोलत आहेत. तुम्ही गुवाहाटीत काय शाखा काढायला गेला होता का? जेपी नड्डा शिवसेनेवर बोलले तेव्हा शंभुराज तुम्ही गप्प का होता? तुमच्या आजोबाने स्वाभिमान अबाधित ठेवला. तुम्हाला आजोबांचे विचार समजले नाही, … Read more

कॅप्टन अमोल यादव यांना राज्य सरकारच मोठं गिफ्ट : विमान निर्मितीच्या संशोधनासाठी 12.91 कोटींचा निधी मंजूर

Captain Amol Yadav Devendra Fadnavis Eknath Shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्यातील भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याची निर्मिती करणारे अमोल यादव यांच्याबाबतीत एक मोठा निर्णय घेण्यात आला. विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी अमोल यादव यांना 12.91 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सामाजिक न्याय विभागाकडून विशेषबाब … Read more

पाटण येथे विद्युत रोषणाई करताना वीज कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू

Patan Crime News

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला विद्युत रोषणाई करताना एका वीज कर्मचाऱ्यांचा शॉक मृत्यू झाला. पाटण तालुक्यातील लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखाना परिसरात नुकतीच ही दुर्घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे नेते तथा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा बुधवार (दि. 17) रोजी वाढदिवस … Read more

अवसरी येथे 22 वर्षे युवक तलावात बुडाला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना घडली आहे. दत्ता रघुनाथ शिर्के (रा. अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक जनावरे करण्यासाठी घेऊन गेला होता. त्यानंतर जनावरे धुण्यासाठी पाझर तलावाजवळ त्याने … Read more

शिंदे गटाकडून शिवसेना जिल्हा प्रमुखपदी जयवंत शेलार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा शिवसेना प्रमुखपदावरून आता उध्दव ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने पहायला मिळणार आहे. खरी शिवसेना व पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या यावरून दोन्ही गटात राज्यभर चढोअोढ सुरू आहे. आता सातारा जिल्हा प्रमुख पदावर हर्षद कदम यांच्या नियुक्तीनंतर जयवंत शेलार यांचीही त्याच पदावर निवड झाल्याचे पत्र समोर आले आहे. शिवसेनेतील फूटीनंतर पाटण विधानसभा … Read more