नवीन पक्षात प्रवेश करण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही; राजीनाम्यानंतर रुपाली पाटील यांचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसे नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ करीत पक्षातील सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे हे नेहमीच हृदयात राहतील. मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. … Read more

रुपाली ठोंबरे-पाटील यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का

पुणे | मनसे नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुणे दौर्यापूर्वीच पक्षाला मोठा धक्का बसला  मनसेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. रुपाली ठोंबरे यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिला आहे. मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांवर अरेरावी कराल तर…; राज ठाकरेंचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकावर भाजा नेत्यांकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागले आहे. “एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर प्रमुख नेत्यांनी बोलायला हवे. एसटी कर्मचाऱ्यांना चार चार महिने पगार नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती समजावून घेण्याऐवजी अरेरावी … Read more

शिवसेनेने युतीमध्ये केलेल्या घाताचे उत्तर भविष्यात जनताच त्यांना देईल; लाड यांचा शिवसेनेवर निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई जिल्हा बॅंक निवडणुकीशी महापालिका व पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान आज मुंबई जिल्हा बँकेच्या सदंर्भात भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ज्यावेळी शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. आणि त्या युतीच्या जोरावर आपले आमदार निवडून आणले. त्यानंतर … Read more

मनसे लढविणार स्वबळावर निवडणूका; बाळा नांदगावकरांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या नवीन घरी भेट दिली. तसेच दोघांमध्ये आघामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने चर्चाही झाल्याचे सांगण्यात आले. या दरम्यान आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठे विधान केले आहे. आगामी महापालिकांच्या … Read more

देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर दाखल; कारण गुलदस्त्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राच्या राजकारणात गेले अनेक दिवस विविध घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापना, त्यानंतरचे नाराजीनाट्य अशा अनेक घडामोडींनंतर आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजप नेते यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून जवळीक वाढत आहे. दरम्यान, आज भाजपचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मनसे अध्यक्ष राज … Read more

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर रोहित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते राज ठाकरेंकडून राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. राज ठाकरेंच्या टीकेतून अनेक अर्थ निघत आहेत. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ट्विट करीत त्यामागचा अर्थही सांगितला आहे. “विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय !” असे … Read more

महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच; मनसेचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल*

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे नेते राज ठाकरे व राष्ट्रवादी असा नवा वाद आता सुरु झाला आहे. याबाबत मनसे नेते राज ठाकरेंकडून राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. दरम्यान, मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी देखील राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला असून त्यांनी “महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच,” असे ट्विटकरीत निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला … Read more

शरद पवारांच्या सल्ल्याला राज ठाकरेंनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी “राज ठाकरेंनी प्रबोधनकार ठाकरेंचे विचार वाचावेत”, असा सल्ला दिल्यानंतर त्यांच्या सल्याला राज ठाकरे प्रत्युत्तर दिले आहे. “मी प्रबोधनकार ठाकरेही वाचलेत आणि मी यशवंतराव चव्हाणही वाचलेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे, असे ठाकरेंनी म्हंटले आहे. यावेळी … Read more

राष्ट्रवादीचे खायचे दात अन दाखवायचे दात वेगळे; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून टीकास्त्र डागले जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीवर टीका केल्यानंतर देशपांडे यांनी आज पुन्हा निशाणा हल्लाबोल केला. “राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे अन दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका देशपांडे यांनी केली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादीकडून … Read more