‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबद्दल बोलताना, अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं

मनसेच्या नव्या झेंड्याच अनावरण आज राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन झेंड्यावर रेल्वे इंजिन जाऊन त्याची जागी शिवमुद्रा दिसत आहे

मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पक्षाचा झेंडा गायब, उरलं केवळ इंजिन

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते.

राज ठाकरेंनी केली लता दीदींच्या आरोग्यांसाठी विशेष प्रार्थना

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयांनी बुधवारी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे. आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात असं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

उल्हासनगरमध्ये मनसे राष्ट्रवादीसोबत; ज्योती कलानींना मोठा दिलासा

कलानींच्या प्रचारात आम्ही पूर्णपणे सहभागी होणार आहे असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सांगण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांची आज ईडीकडून चौकशी

टीम, HELLO महाराष्ट्र| महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडीकडून चौकशी होणार आहे. या कारवाईमुळे मनसैनिकांत असंतोष असून त्यातून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. या यंत्रणांना मी योग्य ती उत्तरे देईनच; तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन राज यांनी केले आहे. ईडीने राज यांना चौकशीस हजर राहण्यास बजावल्यानंतर … Read more

ईडी नोटिसीचे ‘राज’कारण ; २२ ऑगस्टला मनसे ईडी कार्यालया समोर करणार शक्तिप्रदर्शन

मुंबई प्रतिनिधी |  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंड प्रकरणी नोटीस पाठवून २२ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले आहे. कोहिनूर मिल भूखंड विक्री संदर्भात काही तरी काळेबेरे आहे असा ईडीला संशय आहे. म्हणूनच ईडीने राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र या सर्व प्रकारात मनसेने राजकारण करण्याचा चांगलाच इरादा केला असून मनसे शक्तिप्रदर्शन … Read more

उन्मेष जोशींची ईडीने केली ७ तास चौकशी

मुंबई प्रतिनिधी | माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने सात तास चौकशी केली. चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याचे ते म्हणाले. उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे … Read more

राज ठाकरेंना ईडीने पाठवलेल्या नोटिसीवर मुख्यमंत्री म्हणतात

मुंबई प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने कोहिनूर मिल भूखंडाच्या प्रकरणात नोटीस पाठवली आहे. त्या प्रकरणी मनसेने भाजप सूडाचा डाव खेळत असल्याचे म्हणत भाजपवर सडकून टीका केली आहे. तर याच प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी याबद्दल म्हणले की ईडी एक स्वायत्त संस्था आहे. राज ठाकरे यांना आलेल्या नोटिसी बद्दल मला फक्त … Read more

सावधान ! या यादी मधील पासवड तुम्ही ठेवला आहे का ? तर त्याला आहे हॅकर्सचा धोका

Untitled design

पुणे |आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास आजची पिढी अग्रेसर असते. त्याच प्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सर्वांनाच आवड असते. मात्र तुमचा पासवड तुमचा पर्सनल डेटा लिक करू शकतो. त्यामुळे तुम्ही सावधानी बाळगा आणि खालील पासवड तुम्ही वापरत असाल तर तो पासवड त्वरित बदलून घ्या. नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने केलेल्या संशोधनातून हे समोर आले आहे कि साधारता … Read more